पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित होते. ” राष्ट्रपती भवन: फ्रॉम राज टू स्वराज ” या पुस्तकाचे त्यांनी प्रकाशन करून त्याची पहिली प्रत राष्ट्रपतींना सादर केली.
पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानपदाच्या सुरवातीच्या दिवसात राष्ट्रपतींनी आपल्याला केलेल्या मार्गदर्शनाचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले.
राष्ट्रपतींच्या अनुभवाचा राष्ट्राला प्रदीर्घ काळ लाभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत काम करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपले भाग्य असल्याचे पंतप्रधान यावेळी बोलतांना म्हणाले.
पंतप्रधानानी आज प्रकाशित झालेल्या तीन पुस्तकांमुळे राष्ट्रपती भवनाचा इतिहास आणि त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्यांचे जीवन आणि कार्यासह राष्ट्रपती भवनाचे विविध पैलू उलगडत असल्याचे सांगितले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने या तिन्ही पुस्तकाचे प्रकाशन केले असून माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी ” राष्ट्रपती भवन:फ्रॉम राज टू स्वराज ” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी साहाय्य केले आहे.
BG / NC
Attended a book release programme at Rashtrapati Bhavan & released the book 'Rashtrapati Bhavan: From Raj to Swaraj' https://t.co/xcA4844I9q pic.twitter.com/0hnBmCQhbl
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2016