Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निवडक भाषणाच्या चौथ्या खंडाचे पंतप्रधानांच्या हस्‍ते प्रकाशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निवडक भाषणाच्या चौथ्या खंडाचे आज प्रकाशन केले.

या प्रसंगी पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन त्यांना नेहमीच उपयुक्त ठरेल. ज्यांनी ज्यानी प्रणव मुखर्जी सोबत काम केले आहे त्याना देखील नक्कीच असे वाटत असेल.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे अतिशय ज्ञानी आणि अतिशय साधे व्यक्ती आहेत अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांचे वर्णन केले. कार्यालयीन कामकाजाविषयी जेव्हा कधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींसोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि विधायक मार्ग सुचवला, असे मोदी म्हणाले.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवन हे ‘लोक भवन’ झाले होते. पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रपतींच्या कार्यकाळात ऐतिहासिक कागदपत्रांचा खजिना खुला झाला आहे. या प्रयत्नांसाठी त्यांनी राष्ट्रपतींच्या चमूची प्रशंसा केली.

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor