Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल स्पर्धा 2018 तील भारतीय पथकाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


राष्ट्रकुल स्पर्धा 2018 तील भारतीय पथकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“प्रत्येक भारतीयाला अत्यंत अभिमान वाटावा, अशी कामगिरी 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाने केली आहे. आपल्या सर्व खेळाडूंनी सर्वोत्तम योगदान दिले आणि ते उत्तम प्रकारे खेळले. पदके मिळवणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे मी अभिनंदन करतो.

राष्ट्रकुल स्पर्धा 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रत्येक खेळाडूने आम्हाला प्रेरणा दिली आहे. पराकोटीची समर्पण वृत्ती आणि वज्रकठोर निर्धारामुळे त्यांनी कशाप्रकारे अगणित अडथळे पार करुन राष्ट्रकुलमध्ये यशोशिखर गाठले ते त्यांच्या जीवनपटावरुन समजते.

राष्ट्रकुल स्पर्धा 2018 तील भारताच्या यशामुळे आणखी तरुण क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होतील आणि आरोग्यसंपन्न राहण्याबाबत अधिक जागरुकता निर्माण होईल, अशी मला आशा आहे.

शारिरिक बळकट भारत चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सरकार करत आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

B.G/S.K/P.M