केंद्रीय मंत्री मंडळाने, राज्य घटना(जम्मू आणि काश्मीरसाठी लागू) आदेश 1954 च्या सुधारणेला,राज्य घटना (जम्मू आणि काश्मीरसाठी लागू) दुरुस्ती आदेश 2017 द्वारे पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे.
यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्र्पतींच्या संमतीनंतर,घटना दुरुस्ती आदेश 2017 ,शासनाच्या 6 जुलै 2017 च्या राजपत्रात आधीच अधिसूचित करण्यात आला आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha