Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्योत्सव मेळा मैदान इथे छत्तीसगड राज्योत्सव – 2016 च्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राज्योत्सव मेळा मैदान इथे छत्तीसगड राज्योत्सव – 2016 च्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

राज्योत्सव मेळा मैदान इथे छत्तीसगड राज्योत्सव – 2016 च्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


व्यासपीठावर उपस्थित छत्तीसगडचे राज्यपाल बलराम दास टंडन, छत्तीसगडचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग, केंद्रातील मंत्री परिषदेतील माझे मित्र विष्णू देव जी, छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल, छत्तीसगड सरकारचे सर्व मंत्री, खासदार रमेश जी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित छत्तीसगडमधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

सध्या देश दिवाळीच्या सणात गर्क आहे. सगळीकडे दिवाळी साजरी होत असतानाच मला छत्तीसगडला यायची संधी मिळाली. मी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्यासाठी हा विशेष भाग्याचा दिवस आहे जेव्हा माता भगिनी आशीर्वाद देतात तेव्हा आपल्याला अधिक जोमाने कार्य करण्याचे बळ मिळते. आज भाऊबीजेच्या या सणाच्या दिवशी छत्तीसगडमधल्या लाखो बहिणींनी मला इथे येऊन आशीर्वाद दिले आहेत. विशेषतः माझ्या आदिवासी बहिणींनी मला आशिर्वाद दिले आहेत. मी या सर्व बहिणींना नमन करतो आणि मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, तुमचा हा भाऊ भारत मातेच्या सेवेसाठी, सव्वाशे कोटी देशवासीयांच्या कल्याणासाठी तुमच्या आशीर्वादाच्या सहाय्याने हे कार्य करण्यात कोणतीही कुचराई करणार नाही.

छत्तीसगडचे आपले राज्यपाल आम्हा सर्वांचे वरिष्ठ नेता बलराम दास यांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज असा एक महत्वपूर्ण दिवस आहे, ज्याकरिता आपण भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जितके आभार मानू तितके कमीच आहेत. आज संपूर्ण छत्तीसगडतर्फे, संपूर्ण मध्यप्रदेश तर्फे, संपूर्ण झारखंड तर्फे आम्ही अटल बिहारी वाजपयी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. छत्तीसगडच्या निर्मितीबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

कोणत्याही राज्याची रचन इतक्या शांततेत, प्रेमळ आणि आपुलकीच्या भावनेला अधिक बळकटी प्रदान करणारी असो मग ती छत्तीसगडची निर्मिती असो, झारखंडची निर्मिती असो, उत्तराखंडची निर्मिती असो या सर्वामध्ये कायम एक दूरदृष्टी ठेवून सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या समस्यांचे समाधान करत लोकशाहीच्या परंपरा आणि मर्यादांचे पालन करत यांची निर्मिती कशाप्रकारे केली जाऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण वाजपेयीनी आपल्या समोर ठेवले आहे. नाहीतर आपल्याला माहीतच आहे आपल्या देशामध्ये राज्यांच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान किती कटुता निर्माण केली आहे, किती विवाद निर्माण केले आहेत. वेगळ्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर विकासाच्या दिशेने योग्यप्रकारे कार्य केले नाही तर नेहमी वैर भावनेला खतपाणीच घातले जाते. आपण भाग्यवान आहोत की, वाजपेयीं सारख्या महान नेत्याने आपल्याला छत्तीसगड सारखे राज्य दिले. कोणी हा विचार केला होता की, १६ वर्षापूर्वी जेव्हा छत्तीसगडची निर्मिती झाली तेव्हा देशाच्या इतर राजांना विकास मार्गात हे आदिवासी बहुल नक्षलप्रभावित राज्य टक्कर देऊ शकेल आणि विकासाच्या मुद्द्यावर आपली प्रगती करेल. १३ वर्षांपर्यंत डॉ. रमण सिंग यांना या राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आमचा मंत्र आहे…..विकासाचा. देशाच्या प्रत्येक समस्येच समाधान जे केवळ एका आणि एकाच मार्गाने होऊ शकते आणि तो म्हणजे विकासाचा मार्ग.

आम्हाला जिथे जिथे सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्या सर्व राज्यांमध्ये आणि आता भारत सरकार मध्ये आम्ही विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करत आहोत. आज माझे हे देखील सौभाग्य आहे की, ज्यांचे मार्गदर्शन आणि चिंतनाच्या आधारशिलेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची धोरणे तयार करतो आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी आम्ही शुध्द भावनेने, सेवाभावनेने स्वतःला समर्पित करतो त्या प्रेरणा पुरुष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष गरीब कल्याणकारी वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. जिथे वर्षभर सरकारे, समाज, समाजसेवी संघटना गरिबांच्या कल्याणासाठी कार्यक्रम करण्यात आपले लक्ष केंद्रित करतील. आज त्या महापुरुष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे लोकार्पण करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले; आणि जनपथ ते राजपथ पर्यंत एका आत्मपथाचे देखील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या चिंतनाचा परिचय जर एका शब्दात करून दयायचा असेल तर एकात्मता तो एकात्म पथ देखील निर्माण केला आहे. सकाळी आल्यापासून मी सगळीकडे जाऊन योजना बघत होतो. मन प्रभावित करणाऱ्या मोठ्या मोठ्या योजनांची अंमलबजावणी होत आहे. निर्माणकार्य उत्तमप्रकारे झाले आहे, आणि आजच नाही ५० वर्षांनंतर कोणी छात्तीसगडला आले आणि त्यांनी नवीन रायपुर, एकात्म पथ बघितलं तर त्यांना हेच वाटेल की, एक छोटेसे राज्य देखील काय किमया घडवू शकते. आदिवासी क्षेत्र देखील नवीन प्रकाश घेऊन समोर घेऊन येवू शकते. आज जो शिलान्यास झाला आहे त्यातून हा संदेश सर्वदूर पसरला आहे. हे २१ वे शतक आहे, छत्तीसगड मध्ये ज्या आता पायाभरणी होत आहेत. आज ज्या योजनांचा विकास होत आहे. गरीबातील गरीबाच्या कल्याणाकडे लक्ष दिले जात आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून इथली जी नैसर्गिक संपत्ती आहे त्याला मूल्यवर्धित करून भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न छात्तीसगडच्या भूमीवरून, छत्तीसगडच्या नागरिकांकडून, छत्तीसगडच्या सरकारद्वारे डॉ. रमण सिंग यांच्या चमूकडून केला जात आहे. त्याचा प्रभाव शतकांपर्यंत राहील. ही इतकी मजबूत पायाभरणी होत आहे जी छत्तीसगडचे भाग्य बदलेल. इतकेच नाही तर भारताचे भाग्य बदलण्यामध्ये देखील याची भूमिका महत्वपूर्ण ठरेल.

डॉ. रमण सिंग आज मला त्यांच्या सर्वात आवडता प्रकल्प जंगल सफारी मध्ये सैर करायला घेऊन गेले होते; आणि तिथे वाटत होते की, वाघ त्यांना ओळखतो, पर्यटनाच्या दृष्टीने नैसर्गिक वातावरणात तयार केलेली ही जंगल सफारी पाहण्यासाठी छत्तीसगड मधीलच नाही तर देशाच्या अन्य भागातून देखील लोकं इथे येतील याचा मला विश्वास आहे. पर्यटनाच्या विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि पर्यटनाला बळकटी प्रदान करण्यासाठी छत्तीसगडच्या जवळ अनेक क्षमता आहेत. पर्यटनाला आकर्षित करण्यामध्ये इथली शिल्पकला खूप महत्वपूर्ण आहे. इथले जंगल, इथली नैसर्गिक संपत्ती पर्यटकांना निसर्गाकडे नेण्याच्या तयारीत आहेत. जेव्हा आपण पर्यटकांना इको पर्यटनासाठी आमंत्रित करू त्यावेळी छत्तीसगडच्या जंगलांमध्ये इको पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि पर्यटन हे असे क्षेत्र आहे जिथे किमान गुंतवणुकीतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. एक कारखाना उभारायला जितका निधी लागतो आणि त्यातून जितके रोजगार मिळतात त्याच्या दहा टक्के निधीची गुंतवणूक पर्यटन क्षेत्रात करून जास्तीतजास्त लोकांना रोजगार मिळतो आणि पर्यटन हे असे क्षेत्र आहे जिथे गरीबातील गरीब लोकं देखील कमावतात. रिक्षा वाला देखील कमावतो, खेळणी विक्रेता देखील कमावतो, फळ फुलं विकणारा देखील कमावतो, चॉकलेट बिस्कीट विकणार कमावतो, चहा विक्रेता देखील कमावतो. हे क्षेत्र गरीबातील गरीब व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देते आणि म्हणूनच हे नवे रायपुर, ही जंगल सफारी, एकात्म पथ विकास धाम तर आहेतच परंतु भविष्यात इथे पर्यटनाची अजून स्थळ विकसित होतील; आणि ज्याप्रकारे डॉ. रमण सिंग मला सतत या सर्व गोष्टींची माहिती देत होते, मला विश्वास आहे की जी स्वप्न त्यांनी उराशी बाळगली आहेत ती येणाऱ्या भविष्यात संपूर्ण छत्तीसगडसमोर साकारतील आणि रमण सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य आहे ही खूप आनंदाची बाब आहे.

बंधू भगिनींनो, मी हे जेव्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी विषयी बोलतो आहे तेव्हा या देशातून गरीबीचे उच्चाटन करण्यासाठी, गरिबी पासून मुक्ती मिळवून देण्यासाठी, केंद्र असेल राज्य असेल पंचायत असेल किंवा पालिका असेल सगळ्यांनी एकत्रित येवून गरिबी हटवण्याच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. ज्यांनी आपले आयुष्य गरिबीत घालवले आहे त्यांना केवळ मदत देऊन चालणार नाही तर त्यांना सक्षम बनवले पाहिजे. जर त्याला शिक्षित केले गेले त्याला कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले, त्याला त्याच्या कामासाठी साहित्य आणि संधी उपलब्ध करून दिल्या तर तो केवळ आपल्या कुटुंबाचीच गरिबी दूर करेल असे नाही तर आजूबाजूच्या आणखी २ कुटुंबांची गरिबी दूर करण्याची ताकत देखील त्याच्यात येवू शकते; आणि म्हणूनच गरिबांच्या सक्षमीकरणावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आपल्याला माहित आहे गरीब मुलांच्या आरोग्यासाठी सरकारच्या लसीकरणासारख्या योजना सुरु आहेत असे असले तरी एखादी शिक्षित जागरूक माता आहे तिथले स्थानिक लोक देखील जागरूक आहेत तर लसीकरण व्यवस्थित होते गरिबांच्या मुलांनाही भविष्यातील आजारांपासून सुरक्षा कवच प्राप्त होते. परंतु आजही आपल्या देशात अशिक्षितता आहे. एखाद्या गरीब आईला माहीतच नसते की तिच्या मुलाला कोण कोणत्या लसी द्यायच्या आहेत आणि यामुळेच लाखो मुले योजना असूनही निधी असूनही लसीकरणापासून वंचित राहतात. आम्ही एक इंद्रधनुष्य योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत नित्यक्रमाने लसीकरण केले जाते. इथे फक्त बसून राहायचे नाही तर गावा गावात, गल्लोगल्लीत गरीबाच्या घरी जाऊन अशी मुलं शोधायची आहेत. ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशा मुलांना शोधण्याचे अथक प्रयत्न आमचे सर्व स्नेही करत आहेत. त्यांना शोधून त्यांचे लसीकरण करून त्यांना चांगले आरोग्य प्रदान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हे अभियान यशस्वीरीत्या चालवले. फक्त कागदावर योजनेची आकडेवारी असण्यापेक्षा त्याचा सकारात्मक परिणाम मिळण्यावर आम्ही जोर दिला.

एक काळ होता जेव्हा संसद सदस्यांना गॅस जोडणीसाठी २५ कुपन मिळायची आणि शेकडो माणसे, मोठी मोठी माणसं त्या खासदार साहेबांच्या मागे पुढे करायची. घरी गॅस घ्यायचा आहे. मोठी मोठी लोकं शिफारस करायची, आणि कधी तरी बातम्या यायच्या की काही खासदार या गॅस कुपनचा काळा बाजार करतात. गॅस जोडणी मिळणे किती कठीण होते. ही काही खूप जुनी गोष्ट नाही अगदी दहा पंधरा वर्षापूर्वी लोकांना हेच सगळं माहित होते. बंधू भगिनींनो मी निश्चिय केला आहे की, माझ्या गरीब माता ज्यांनी चुलीत लाकूड जाळून त्या चुलीच्या धुरामध्ये आपलं आयुष्य घालवलं. एक गरीब माता जेव्हा चुलीत लाकड जाळून जेवण बनवते तेव्हा दररोज ४०० सिगारेटचा धूर तिच्या शरीरात जातो. तुम्ही कल्पना करू शकता, एक गरीब माता…..दररोज तिच्या शरीरात ४०० सिगारेटचा धूर गेला तर त्या माऊलीच्या प्रकृतीचे किती हाल होत असतील. त्या मुलांची काय परिस्थिती असेल आणि माझ्या देशाच्या भविष्याची काय स्थिती असेल. आपण ह्या गरीब मातांना हे असे आयुष्य जगण्यासाठी सोडून द्यायचे….त्यांना त्यांच्या नशिबाच्या हवाली करून सोडून द्यायचे? आम्ही निश्चिय केला आहे. आगामी ३ वर्षांमध्ये ह्या गरीब कुटुंबांमध्ये…..५ कोटी कुटुंबांची चूल आणि धुरापासून सुटका करनार आणि जंगल तोड थांबवणार आणि मातांना लाकड आणण्यासाठी जंगलापर्यंत जी पायपीट करायला लागत होती ती थांबवणार, मुलांना जेव्हा हवे असेल तेव्हा जेवण बनवून देणे शक्य होईल अशी व्यवस्था करण्याच्या दिशेने आमचे काम जोमाने सुरु आहे.

बंधू भगिनींनो ह्या सर्वाच्या मुळाशी एकाच विचार आहे एकच भावना आहे. देशाला गरिबी मुक्त करणे. बंधू भगिनींनो आम्ही मेक इन इंडिया उपक्रम राबवत आहोत. का? आपल्या देशात तरुणवर्ग आहे यांच्या मनगटात ताकत आहे. भावना पण आहेत आणि बुध्दी देखील. जर त्यांना संधी मिळाली तर जगातल्या उत्तमोत्तम वस्तू निर्माण करण्याची ताकत या तरुणांकडे आहे. त्यांना कौशल्य शिकायचे आहे जर कौशल्य शिकवले, कौशल्य विकास केला तर माझ्या तरुण मित्रांमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता आहे. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही कौशल्य विकासाचे वेगळे मंत्रालय स्थापन केले. वेगळ्या मंत्र्यांची नियुक्ति केली. अर्थसंकल्पामध्ये वेगळ्या निधीची तरतूद केली. आणि संपूर्ण देशात सरकारद्वारे, राज्यांतर्फे, केंद्राकडून, उद्योगसमुहांकडून, सार्वजनिक खाजगी भागीदारीतून जी संकल्पना जिथे लागू पडेल तिथे लागू करून कौशल्य विकासाचे मोठे अभियान सुरु केले. सुखवस्तू घरातील मुलं तर चांगल्या महाविद्यालयांमध्ये जातात परदेशात जातात. गरिबाघरची मुलं जी मोठ्या मुश्किलीने तिसरी पाचवी पर्यंत शिकतात आणि नंतर शिक्षण सोडून देतात. आणि अकुशल कामगार म्हणून संपूर्ण आयुष्य घालवतात. आम्ही अशा मुलांना शोधून कौशल्य विकासाच्या दिशेने काम करत आहोत जेणेकरून गरीबातील गरीब मुले देखील सन्मानाने आपल्या हातातल्या कौशल्याच्या सहाय्याने आपले भविष्य घडवू शकेल. आम्ही त्या दिशेने कार्य करत आहोत कारण आम्हाला देश गरिबी मुक्त करायचा आहे. हे काम कितीही खडतर असले तरीही गरिबी उच्चाटनामध्येच देशाचे कल्याण आहे. जर देशाला गरीबी मुक्त नाही केले तर बाकी हजारो गोष्टी केल्या तरी देशाचे भाग्य बदलू शकणार नाही. आणि ह्याचसाठी आम्ही आमचे पूर्ण लक्ष आणि ताकद गरिबांच्या कल्याणासाठी लावली आहे. आमच्या शेतकऱ्याचे कुटुंब वाढत आहे. जमिनीची व्याप्ती कमी होत आहे. पिढ्यानपिढ्या जमिनीची वाटणी होत आहे. जमिनीच्या छोट्या तुकड्यातून उत्पन्न घेऊन उदरनिर्वाह करणे घर चालवणे कधी कधी कठीण होते. एखाद्या शेतकऱ्याची ३ मुलं आहेत त्याला तुम्ही विचारले की मुलांचा काय विचार केला आहे तर तो सांगेल एकाला शेती देईन आणि बाकी दोघांना पोटापाण्याची सोय करण्यासाठी शहरात पाठवून देईन. आमच्या कृषी क्षेत्राला शेतांना लवचिक बनवायचे आहे. जमिनीच्या छोट्या तुकड्यातून देखील जास्तीतजास्त उत्पादन मिळेल, चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळेल. अशी अर्थव्यवस्था कृषी अर्थव्यवस्था असावी. शेतकऱ्याच्या शेतमालाला संपूर्ण देशात बाजारपेठ मिळाली पाहिजे. आजूबाजूचे काही दलाल व्यापारी शेतकऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा उठवून त्याचा माल त्याच्याकडून बळाने घेतात. ही परिस्थिती बंद व्हायला पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही E-NAM ने देशातल्या सर्व बाजारपेठा ऑनलाईन केल्या. आता शेतकऱ्याला आपल्या मोबाईल फोनच्या मदतीने कळू शकेल की त्याच्या शेतमालाला कुठे जास्ती किंमत मिळतो मग तो तिथे आपला माल विकू शकेल अशी व्यवस्था विकसित केली आहे.

मी आज इथे कृषी स्टोअर पाहिले त्यांनी देखील E-NAM लोकांना समजावण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण देशात शेतकऱ्यांना एकसमान बाजारपेठ मिळावी. शेतकऱ्यांच्या मर्जीने त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा. यावर आम्ही जोर दिला आहे. आजकाल नैसर्गिक आपत्ती येतात कधी दुष्काळ, तर कधी पूरपरिस्थिती, कधी पिक तयार झाल्यानंतर पाऊस आल्याने सर्व उध्वस्त होते. पहिल्यांदा पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत माझ्या देशाच्या शेतकऱ्यांना सुरक्षेची हमी मिळाली. खूप कमी पैशात ही विमा योजना आहे. शेतकऱ्यांना खूप कमी पैसे भरायचे आहेत. जास्तीतजास्त पैसे सरकार देणार. भारत सरकार देणार. जर त्याला जून मध्ये पेरणी करायची आहे, परंतु जुलै पर्यंत जर पाऊसच झाला नाही त्याने पेरणीच केली नाही म्हणजे पिकाचे नुकसान झाले नाही. त्याला तर विमा मिळणार नाही. आम्ही अशी पंतप्रधान पिक विमा योजना तयार केली आहे ज्यात कोणत्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पेरणी करू शकला नाही अगदी त्याने एक इंच जमिनीत देखील पेरणी केली नसेल तरीदेखील त्याचा हिशोब करून, त्याच्या वर्षभराच्या उत्पनाचा हिशोब करून त्याला विम्याचे पैसे मिळतील. पहिल्यांदा देशात हे घडत आहे.

संपूर्ण पिक तयार होईपर्यंत चांगला पाऊस पडला. एकदम चांगले पिक झाले शेतात पिकाच्या राशी पडल्या आहेत बस एक दोन दिवसात कोणाचा ट्रॅक्टर मिळाला तर बाजारपेठेत जायचे आहे आणि असे असतानाच अचानक पाऊस आला. संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. आतापर्यंत असे होत होते की विमा कंपनी वाले सांगायचे, तुमचे पिक तुमच्या शेतात उभे होते तव्हा तुमचे काही नुकसान झालेले नाही त्यामुळे तुम्हाला विम्याची रक्कम मिळणार नाही. आम्ही अशी पंतप्रधान पिक विमा योजना घेऊन आलो आहोत जिथे कापणी नंतर १५ दिवसांच्या आत जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले तर पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे मिळतील. इथपर्यंत व्यवस्था केली आहे. माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धन करणे. शेतकरी जे पिक घेतो त्याचे मूल्यवर्धन व्हावे. जर तो आंबे पिकवत असेल तर लोणचे बनवत असेल तर ते जास्त किंमतीला विकले जाते. तो दुधाचे उत्पन्न घेत असेल आणि तो फक्त दुध विकत असेल तर त्याला कमी पैसे मिळतात. दुधाची मिठाई बनवून ती विकली तर त्यातून त्याला जास्त पैसे मिळतील. हे मूल्यवर्धन झाले पाहिजे. मी पाहिले छत्तीसगडमध्ये असे अनेक कार्यक्रम सुरु केले आहेत. जिथे शेतकरी जे उत्पन्न घेतो त्याचे मूल्यवर्धन केले जाते. जर ऊस उत्पादक शेतकरी असेल आणि तो केवळ ऊस विकत असेल तर त्याला कमी पैसे मिळतील परंतु त्या उसापासून साखर तयार केली तर ऊस उत्पादक शेतकरी देखील अधिक पैसे कमावेल. आणि ह्याचसाठी म्हणूनच आमचे लक्ष गाव, गरीब, शेतकरी, कामगार, तरुण यांना सक्षम करून देश विकासाची नवीन उंची कशा प्रकारे गाठू शकेल यावर आहे आणि त्या दिशेने एक एक पाऊल उचलत आहोत. देशाचे सरकार सहकार्यात्मक संघीयवादाच्या सहाय्याने सहकार्यात्मक स्पर्धात्मक संघीयवादाला बळकटी प्रदान करून मार्गक्रमण करत आहे. आमची इच्छा आहे की राज्या राज्यांमध्ये स्पर्धा व्हावी. विकासाची स्पर्धा व्हावी. जर एखादे राज्य हागणदारीमुक्त झाले तर दुसऱ्या राज्याला देखील असे वाटले पाहिजे की आपण का मागे रहावे. आम्ही पण हे करूनच दाखवू. जर एखाद्या राज्यात एखादा उद्योग जोरात सुरु असेल तर दुसऱ्या राज्याने दुसरा एखादा उद्योग सुरु करावा आणि पुढे निघून जावे. आम्हाला राज्या राज्यांमध्ये स्पर्धा हवी आहे. विकासाची स्पर्धा हवी आणि भारत सरकार जे विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाऊ इच्छिते ते अशा सर्व राज्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. छत्तीसगड भविष्यात विकासाच्या ज्या कोणत्या योजना घेऊन येईल, तसेच आतापर्यंत ज्या योजना घेऊन आले आहे त्या सर्व योजनांसाठी केंद्र सरकार छत्तीसगड सरकारच्या सोबत आहे आणि भविष्यात देखील असेल. छत्तीसगडला विकासाची नवीन उंची गाठण्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य करू. मी पुन्हा एकदा छत्तीसगडच्या या राज्योत्सवानिमित्त छत्तीसगडच्या जनतेला कोटी कोटी शुभेच्छा देतो. छत्तीसगडच्या विकासासाठी भारत सरकार संपूर्ण सहकार्य करेल हे आश्वासन देतो.आपण सर्वांनी मिळून छत्तीसगडला विकासाच्या नवीन उंचीवर नेवून ठेवूया याच शुभेच्छासह माझ्या सोबत भारत माता की जय चा जयघोष करूया. आवाज सर्वदूर पोहोचला पाहिजे.भारत माता की जय.भारत माता की जय. भारत माता की जय.खूप खूप धन्यवाद.

N.Sapre/S.Mhatre/Anagha