Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेच्या नवीन नामनिर्देशित सदस्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 6 जुलै 2022

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.धावपटू  पी.टी. उषा, संगीतकार इलायाराजा, परोपकारी कार्य करणारे आणि समाजसेवक वीरेंद्र  हेगडे, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु  हे राज्यसभेसाठी नामनिर्देशित  उमेदवार आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“उल्लेखनीय योगदान दिलेल्या पीटी उषा जी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेत.क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वश्रुत आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे  कार्य तितकेच कौतुकास्पद आहे.राज्यसभेवर नामांकन  झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. @PTUshaOfficial”

@ilaiyaraaja इलायाराजा जी यांच्या सर्जनशील प्रतिभेने पिढ्यानपिढ्या लोकांना मोहीत  केले आहे. त्यांची कामे अनेक भावना  सुंदररित्या प्रतिबिंबित करतात. तितकाच प्रेरणादायी आहे त्याचा जीवन प्रवास – त्यांची जडणघडण विनयशील पार्श्वभूमीतून झालेली आहे आणि त्यांनी खूप काही साध्य केले आहे. त्यांना राज्यसभेवर नामांकन मिळाल्याचा आनंद आहे.”

“वीरेंद्र हेगडे जी  समाजसेवेच्या क्षेत्रात  आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची आणि आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीसाठी  ते करत असलेल्या महान कार्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. ते  संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करतील.

“व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगताशी  संबंधित  आहेत.त्यांच्या कलाकृतींनी भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडवले असून जागतिक स्तरावर ठसा उमटवला.राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.”

 

 

 

 

 

S.Kulkarni /S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com