मालासेरी डूंगरी की जय, मालासेरी डूंगरी की जय!
साडू माता की जय, साडू माता की जय!
सवाईभोज महाराज की जय, सवाईभोज महाराज की जय!
देवनारायण भगवान की जय, देवनारायण भगवान की जय!
साडू माता गुर्जरी की ई तपोभूमि, महादानी बगड़ावत सूरवीरा री कर्मभूमि, और देवनारायण भगवान री जन्मभूमि, मालासेरी डूँगरी न म्हारों प्रणाम।
हेमराज जी गुर्जर, सुरेश दास जी, दीपक पाटिल जी, राम प्रसाद धाबाई जी, अर्जुन मेघवाल जी, सुभाष बहेडीया जी आणि देशभरातून आलेल्या माझ्या प्रिय बंधू–भगिनीनो,
आज या पवित्र प्रसंगी भगवान देव नारायण जी यांचा सांगावा आला आणि जेव्हा भगवान देवनारायण जी यांच्याकडून आमंत्रण आले तर कोणी ही संधी सोडेल का ? मी सुद्धा हजर झालो.आपण लक्षात घ्या, इथे कोणी पंतप्रधान आलेले नाहीत. मी संपूर्णपणे भक्तिभावाने आपणा सर्वांप्रमाणेच एक भाविक म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो आहे. यज्ञशाळेत पूर्णाहुती देण्याचे भाग्य ही मला लाभले.माझ्यासाठी हे भाग्य आहे की माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला आज आपणा सर्वांमध्ये येऊन भगवान देवनारायण जी आणि त्यांच्या सर्व भक्तांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचे हे पुण्य लाभले आहे. भगवान देवनारायण आणि जनता जनार्दन, दोन्हीचे दर्शन घेऊन मी आज धन्य झालो आहे. देशभरातून आलेल्या सर्व भाविकांप्रमाणेच मी भगवान देवनारायण यांच्याकडून अविरत राष्ट्रसेवेसाठी, गरिबांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.
मित्रहो,
हा भगवान देवनारायण यांचा एक हजार एकशे अकरावा अवतरण दिवस आहे. यानिमित्त आठवडाभर कार्यक्रम सुरु आहेत.हा जितका मोठा सोहळा आहे तितकीच भव्यता, तितकीच मोठी भागीदारी गुर्जर समाजाने सुनिश्चित केली आहे. यासाठी मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो,समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नाची प्रशंसा करतो.
बंधू–भगिनीनो,
भारताचे आपण लोक,हजारो वर्षांचा आपला प्राचीन इतिहास, आपली संस्कृतीचा अभिमान बाळगतो. जगातल्या अनेक संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या.त्यांना काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवता आला नाही. भारतालाही भौगोलिक,सांस्कृतिक,सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या तोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र कोणतीही शक्ती भारताचे सामर्थ्य नष्ट करू शकली नाही. भारत केवळ एक भूभाग नाही,तर आपली संस्कृती, सद्भावना यांची अभिव्यक्ती आहे. म्हणूनच आज भारत आपल्या वैभवशाली भविष्याचा पाया आज घालत आहे. यामागे सर्वात मोठी प्रेरणा,सर्वात मोठी शक्ती काय आहे ? कोणत्या शक्तीमुळे, कोणाच्या आशीर्वादाने भारत अटल आहे,अमर आहे ?
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो,
ही शक्ती आपल्या समाजाची शक्ती आहे. देशातल्या कोट्यवधी जनतेची शक्ती आहे.भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात समाज शक्तीची मोठी भूमिका राहिली आहे. प्रत्येक महत्वाच्या कालखंडात आपल्या समाजातून अशी उर्जा निर्माण होते ज्याचा प्रकाश सर्वाना मार्ग दाखवतो,सर्वांचे कल्याण साधतो. भगवान देवनारायण हे ही असेच उर्जापुंज होते, अवतार होते ज्यांनी, अत्याचाऱ्यापासून आपले जीवन आणि संस्कृती यांचे रक्षण केले.देहरूपी 31 वर्षांचे आयुष्य व्यतीत केल्यानंतर जनमानसात अमर होणे हे सर्वसिद्ध अवतारीनाच शक्य आहे. समाजातल्या अनिष्टता दूर करण्याचे साहस त्यांनी केले,समाजाला एकजूट केले, समरसतेची भावना रुजवली.भगवान देवनारायण यांनी समाजाच्या विविध वर्गातल्या लोकांना एकत्र आणत आदर्श व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले. म्हणूनच भगवान देवनारायण यांच्या प्रती समाजातल्या सर्व वर्गातील लोकांची श्रद्धा आहे आणि भगवान देवनारायण आजही लोकजीवनात कुटुंब प्रमुखाप्रमाणे आहेत, कुटुंबांच्या सुख– दुःखात त्यांचे स्मरण केले जाते.
बंधू–भगिनीनो,
भगवान देवनारायण यांनी नेहमीच सेवा आणि लोक कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिले. हीच शिकवण, इथून हीच प्रेरणा घेऊन भाविक जातात. ज्या कुटुंबातून ते आले होते त्यात त्यांना कशाचीही कमतरता नव्हती मात्र सुख सुविधाऐवजी त्यांनी सेवा आणि जनकल्याणाचा खडतर मार्ग निवडला. आपल्या उर्जेचा उपयोग त्यांनी प्राणीमात्राच्या कल्याणासाठी केला.
बंधू–भगिनीनो,
‘भला जी भला, देव भला’। ‘भला जी भला, देव भला’ या जयघोषात कल्याणाची कामना आहे. भगवान देवनारायण यांनी जो मार्ग दाखवला आहे तो ‘सबके साथ से सबके विकास’ याचा आहे.आज देश याच मार्गावर वाटचाल करत आहे. गेल्या 8 – 9 वर्षात देशात समाजाच्या वंचित, उपेक्षित वर्गाला सबल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.वंचित वर्गाला प्राधान्य हा मंत्र घेऊन आपली वाटचाल सुरु आहे. रेशन मिळेल की नाही, किती मिळेल ही गरीब वर्गाची सर्वात मोठी चिंता असे हे आपणाला आठवत असेल. आज प्रत्येक लाभार्थ्याला रेशन मिळत आहे, मोफत मिळत आहे. आयुष्मान भारत योजनेद्वारे, रुग्णालयातल्या उपचाराची चिंताही आम्ही दूर केली आहे. घर,स्वच्छतागृह,वीज, गॅस जोडणी यांची गरिबाला चिंता असे, ही चिंताही आम्ही दूर करत आहोत.बँकेद्वारे व्यवहारही फारच कमी लोक करत असत.आज देशात बँकांचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले आहेत.
मित्रहो,
पाण्याचे महत्व राजस्थानइतके कोण जणू शकेल ? स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांनंतरही देशातल्या केवळ 3 कोटी कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचत होते. 16 कोटीहून अधिक जास्त ग्रामीण कुटुंबाना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असे. गेल्या साडेतीन वर्षात देशात झालेल्या प्रयत्नातून आता 11 कोटीपेक्षा जास्त कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचू लागले आहे. देशातल्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठीही व्यापक काम सुरु आहे. सिंचनाच्या पारंपारिक योजनांचा विस्तार असो किंवा नव्या तंत्रज्ञानाने सिंचन, शेतकऱ्याला आज सर्वतोपरी सहाय्य केले जात आहे.
लहान शेतकरी जो कधी सरकारी मदतीसाठी वाट पाहत असायचा, त्यालाही पहिल्यांदा पीएम किसान सम्मान निधितून थेट मदत मिळत आहे. इथे राजस्थान मध्येही शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधिमधून 15 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रककम थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आली आहे.
मित्रांनो,
भगवान देवनारायण यांनी गौसेवेला समाजसेवेचे, समाजाच्या सशक्तिकरणाचे माध्यम बनवले होते. मागच्या काही वर्षापासून देशामध्ये सुद्धा गोसेवेची भावना सतत वृद्धिंगत होत आहे. आपल्या इथे पशुंमध्ये जनावरांमध्ये खूर आणि तोंडाचे आजार खुरकत आणि लाळ्या रोगासारख्या केवढ्या मोठ्या समस्या होत्या, हे तुम्ही सुद्धा चांगल्या तऱ्हेने ओळखता आहात. यापासून आपल्या गाईंना आपल्या पशुधनाला मुक्ती मिळेल यासाठी देशांमध्ये कोट्यवधी पशुंचे मोफत लसीकरण करण्याचे खूप मोठे अभियान सुरू आहे. देशात पहिल्या वेळेला गौकल्याणासाठी राष्ट्रीय कामधेनु आयोग स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अथवा विविध वैज्ञानिक उपायांच्या माध्यमातून पशुपालनाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. पशुधन ही आपली परंपरा आपली केवळ आस्था नाही तर आपल्या ग्रामीण अर्थतंत्राचा ती एक मजबूत भाग आहे. आणि यासाठी पहिल्या वेळेला पशुपालकांसाठी सुद्धा किसान क्रेडिट कार्ड ची सुविधा दिली जात आहे. आज संपूर्ण देशात गोवर्धन योजना सुद्धा सुरू झालेली आहे. ही योजना गोबर (शेण) युक्त शेतीतून मिळणाऱ्या कचऱ्याला, सोन्यामध्ये बदल करण्याचे हे अभियान आहे. आपले जे दुग्ध योजना आहेत त्या शेणापासून तयार होणाऱ्या ऊर्जेवर चालाव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत.
मित्रांनो,
मागच्या वर्षीच्या स्वतंत्रता दिवसाच्या मुहूर्तावर मी लाल किल्ल्यावरून पंच प्रणांवर चालण्याचा आग्रह केला होता, याचा उद्देश हाच आहे की आपण सर्वांनी आपल्या वारशावर अभिमान करावा, गुलामीच्या मानसिकतेतून आपण सर्वांनी बाहेर पडावे आणि देशाच्या प्रती आपल्या कर्तव्यांना जागृत ठेवावे. आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या रस्त्यांवर चालावे आणि आपल्या बलिदान देणाऱ्या सैन्यांप्रती, आपल्या शूरवीरांच्या शौर्याची आठवण ठेवणे हा सुद्धा या संकल्पचा एक भाग आहे. राजस्थान ही तर वारशाची धरणी आहे इथे सृजन आहेत, उत्साह आणि उत्सव सुद्धा आहे. परिश्रम आणि परोपकार सुद्धा आहे. शौर्य इथे घराघराचा संस्कार आहे. रंग आणि राग राजस्थानचे पर्याय आहेत. तेवढेच महत्त्व इथल्या जनजनांच्या संघर्षात आणि संयमात पण आहे. हे प्रेरणास्थान भारताच्या अनेक गौरवशाली काळातल्या व्यक्तित्वांची साक्षीदार राहिली आहे. तेजा–जी पासून पाबू–जी पर्यंत, गोगाजी पासून रामदेवजी पर्यंत, बप्पा रावळ पासून महाराणा प्रताप यांच्यापर्यंत, या महापुरुषांनी जननायकांनी लोक आणि देवतांनी आणि समाजसुधारकांनी नेहमीच देशाला मार्ग दाखवला आहे. इतिहासाचा क्वचितच असा काही असा कालखंड असेल ज्यामध्ये इथल्या मातीने कशासाठी प्रेरणा दिली नसेल.
यामध्ये सुद्धा गुर्जर समाज, शौर्य, पराक्रम आणि देशभक्ती याचे पर्याय राहिले आहेत. राष्ट्ररक्षा असेल किंवा संस्कृतीची रक्षा गुर्जर समाजाने प्रत्येक कालखंडात प्रहरीची भूमिका निभावली आहे. क्रांतिवीर भूप सिंह गुर्जर यांना विजयसिंह पथिक या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखालचे बिजोलिया इथले शेतकरी आंदोलन स्वतंत्रता संग्रामात एक मोठी प्रेरणा ठरले होते. कोतवाल धन सिंह जी आणि जोगराज सिंह जी यासारखे अनेक योद्धे होऊन गेले आहेत ज्यांनी देशासाठी आपलं जीवन बलिदान केले. एवढेच नाही रामप्यारी गुर्जर, पन्ना धाय यासारख्या नारीशक्तीची महान प्रेरणा आम्हाला प्रत्येक वेळेला प्रेरित करते आहे. यातून हेच प्रेरित होते की गुर्जर समाजाच्या बहिणींनी गुर्जर समाजाच्या मुलींनी केवढं मोठं योगदान देश आणि संस्कृतीच्या सेवेसाठी दिलेले आहे, आणि ही परंपरा आजही सतत वृद्धिंगत समृद्ध होत आहे. हे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे की असे अगुनित अनेक सेनानींना आपल्या इतिहासामध्ये ते स्थान मिळू शकलेले नाही ज्याचे ते हक्कदार होते, जे त्यांना मिळायला हवे होते. परंतु आजचा नवा भारत गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या चुकांबद्दल नव्याने सुधारणा करत आहे, नवीन भारत आता भारताची संस्कृती आणि स्वतंत्रता यांच्या रक्षणासाठी भारताच्या विकासामध्ये ज्या कोणी योगदान दिले आहे, त्यांना पुढे आणले जात आहे.
मित्रांनो,
आज हे खूप गरजेचे आहे की आपल्या गुर्जर समाजाची जी नवीन पिढी आहे, जे युवा आहेत ते भगवान देवनारायण यांच्या संदेशांना त्यांच्या शिकवणीला आणखी मजबुतीने पुढे घेऊन जातील. हे गुर्जर समाजाला सुद्धा सशक्त करेल आणि देशाला सुद्धा यापासून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी मदत मिळेल.
मित्रांनो,
एकविसाव्या शतकातला हा काळ अखंड भारताच्या विकासासाठी राजस्थानच्या विकासासाठी सुद्धा खूपच महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला एकजूट होऊन देशाच्या विकासासाठी काम करायचं आहे. आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. भारताने ज्या प्रकारे संपूर्ण जगात आपलं सामर्थ्य प्रस्थापित केले आहे.
आपली ताकद दाखवली आहे, त्यामुळे शूरवीरांच्या या धरणी मातेचा सुद्धा गौरव वाढलेला आहे. आज भारत जगाच्या प्रत्येक जागतिक मंचावर आपले म्हणणे अगदी बिनधोकपणे मांडत आहे. आज भारत दुसऱ्या देशांवरती असलेली आपले अवलंबत्व कमी करू लागला आहे आणि यासाठी प्रत्येक गोष्ट जी आम्हा देशवासीयांच्या एकतेच्या विरुद्ध आहे त्याला आपल्याला दूर ठेवले पाहिजे. आपल्याला आपल्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन जगाच्या अशा आकांक्षांना खरे उतरायचे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की भगवान देनारायण जी यांच्या आशीर्वादामुळे आपण सर्वजण सफल होऊ. आपण कठीण परिश्रम घेऊ, सर्वजण मिळून करूयात, सर्वांच्या प्रयत्नाने सिद्धी प्राप्त करूनच दाखवूया आणि हा पण बघा कसा योगायोग आहे, भगवान देवनारायण जी चे प्रकट वर्ष त्याचवेळी भारताला जी ट्वेंटी शिखर परिषदे चे अध्यक्ष पद आणि त्यामध्येही भगवान देवनारायण यांचे कमळावर प्रकट होणे आणि जी 20 शिखर परिषदेचा जो लोगो आहे त्यामध्ये सुद्धा कमळाच्या फुलावर संपूर्ण पृथ्वीला बसवण्यात आले आहे.
हा पण मोठा योगायोग आहे आणि आपण तर ते लोक आहोत ज्यांचा मुळात जन्म हा कमळासोबत झाला आहे आणि यासाठी माझे आणि तुमचे नाते काहीसे गहन आहे.
परंतु मी पूज्य संतांना नमस्कार करत आहे, एवढ्या मोठ्या संख्येने ते इथे आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत, मी या समाजाचा सुद्धा सहृदय आभार व्यक्त करत आहे की, एका भक्ताच्या रूपात मला आज इथे मोठ्या भक्ती भावाने बोलावले. हा काही सरकारी कार्यक्रम नाही आहे. पूर्णपणे या समाजाच्या ताकदीने, समाजाच्या भक्तीने मला प्रेरित केले आणि मी आपल्या मध्ये सहभागी झालो. माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
जय देव दरबार! जय देव दरबार! जय देव दरबार!
***
M.Jaybhaye/N.Chitale/V.Yadav/P.Kor
भा
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
भीलवाड़ा में भगवान श्री देवनारायण जी के 1111वें अवतरण महोत्सव समारोह में उपस्थित होना मेरे लिए सौभाग्य की बात है। https://t.co/4FZMOuoXWw
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2023
भगवान देवनारायण और जनता जनार्दन, दोनों के दर्शन करके मैं धन्य हो गया हूं: PM @narendramodi in Bhilwara, Rajasthan pic.twitter.com/UQRYUMc1DW
— PMO India (@PMOIndia) January 28, 2023
भारत सिर्फ एक भूभाग नहीं है, बल्कि हमारी सभ्यता की, संस्कृति की, सद्भावना की, संभावना की एक अभिव्यक्ति है। pic.twitter.com/6t9gDge8tv
— PMO India (@PMOIndia) January 28, 2023
भारत की हजारों वर्षों की यात्रा में समाजशक्ति की बहुत बड़ी भूमिका रही है। pic.twitter.com/FGUhCV9RpZ
— PMO India (@PMOIndia) January 28, 2023
बीते 8-9 वर्षों से देश समाज के हर उस वर्ग को सशक्त करने का प्रयास कर रहा है, जो उपेक्षित रहा है, वंचित रहा है। pic.twitter.com/fNAjuP7ZJZ
— PMO India (@PMOIndia) January 28, 2023
हम सभी अपनी विरासत पर गर्व करें, गुलामी की मानसिकता से बाहर निकलें और देश के लिए अपने कर्तव्यों को याद रखें। pic.twitter.com/FPWwXlRlts
— PMO India (@PMOIndia) January 28, 2023
आज पूरी दुनिया भारत की ओर बहुत उम्मीदों से देख रही है।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2023
हमें अपने संकल्पों को सिद्ध कर दुनिया की उम्मीदों पर खरा उतरना है। pic.twitter.com/P8cez7pL0B