Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रस्ते बांधणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत  सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत 4,406 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात 2,280 किमी लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

हा प्रकल्प, देशाच्या इतर भागांप्रमाणेच सुविधा उपलब्ध करून सीमावर्ती भागाच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या बदलत्या मानसिकतेचा परिणाम आहे.

देशाच्या सीमावर्ती भागातील रस्ते आणि दूरसंचार संपर्क आणि पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या सुविधांवर या निर्णयाचा मोठा प्रभाव पडेल. यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान सुधारेल, प्रवास सुलभ होईल आणि दळणवळण सुविधांमुळे हा प्रदेश देशाच्या इतर भागातील महामार्गांच्या जाळ्याशी जोडला जाईल.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai