पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यातील जेतसर येथील सेंट्रल स्टेट फार्ममधील 400 हेक्टर बिनलागवडीच्या शेतजमिनीचा वापर 200 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी करायला मंजुरी दिली आहे. सध्या ही जमीन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या ताब्यात आहे. निवडण्यात आलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारेल.
राष्ट्रीय बियाणे महामंडळ आपल्या ताब्यातील साडेपाच हजार हेक्टर जमिनीपैकी 400 हेक्टर जमीन निवडण्यात आलेल्या कंपनीला देईल. सौर प्रकल्प उभारणीचा खर्च त्या कंपनीला करावा लागेल.
या प्रकल्पामुळे राष्ट्रीय बियाणे महामंडळाला महसूल मिळेल आणि देशासाठी स्वच्छ उर्जेची निर्मिती होईल.
S. Kane /B. Gokhale