Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र धारकांना व्हिसात सूट देण्यासंबंधी आदर्श कराराला मंत्रिमंडळाची मंजुर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र धारकांना आवश्यक व्हिसातून सूट देण्यासंबंधीच्या आदर्श कराराला आज मंजूरी दिली.

यामुळे कोणत्याही देशाच्या राजनैतिक आणि अधिकृत पारपत्रधारकांना भारतात किंवा स्वाक्षरी करणाऱ्या देशात व्हिसा-मुक्त प्रवेश, स्थलांतर आणि 180 दिवसांच्या (किंवा अधिक) कोणत्याही कालावधीत 90 दिवस (किंवा कमी) राहण्याची सुविधा मिळेल.

भारताने आधीच 69 देशांबरोबर व्हिसा मुक्त करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

(Release ID :133808)
S.Kane/S.Tupe/M.Desai