Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळासाठी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन, चोटीला इथे जाहीर सभेला केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या चोटीला इथे जाहीर सभा घेतली.राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमीपूजन, तसेच अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण आणि राजकोट-मोरबी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाची कोनशिलाही पंतप्रधानांच्याहस्तेबसवण्यात आली. संपूर्ण स्वयंचलित दुग्ध प्रक्रिया कारखान्याचे,सुरेंद्रनगरमधल्या जोरावरनगर आणि रतनपूर भागासाठीच्या पेयजल वाहिनीचे त्यांनी लोकार्पण केले.अशा विकास कामांमुळे नागरिक सबल होण्यासाठी मदत होते,असे पंतप्रधान म्हणाले.

हवाई प्रवास ही श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नाही. हवाई प्रवास कनिष्ठ वर्गाच्याही आवाक्यात आम्ही आणला आहे. असे त्यांनी सांगितले.

विकासाची व्याख्या आता बदलली आहे. एकेकाळी हातपंप हे विकासाचे लक्षण मानले तर आज नागरिकांच्या सोयीसाठी नर्मदा नदीचे पाणी आणले आहे.नर्मदेच्या पाण्यामुळे सुरेंद्रनगर जिल्ह्याला मोठा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पाण्याचा जाणीवपूर्वक वापर करून प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा,असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. सुरसागर दुग्धालयामुळे जनतेला मोठा लाभ होणार आहे असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी उत्तम आणि सुरक्षित रस्त्यासाठी केलेल्या कार्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले.

***

S.Tupe/N.Chitale/P.Kor