Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन


आजपासून माझा रशियाचा दौरा सुरु होईल. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा माझा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. या दौऱ्याच्या फलिताबाबत मी खूप आशावादी आहे.

भारत आणि रशियाच्या अनेक दशकांच्या घनिष्ट संबंधांचा इतिहास साक्षीदार आहे. रशिया हा भारताचा जगातील सर्वात मौल्यवान मित्र देशांपैकी एक आहे.

माझ्या मनात वर्ष 2001 च्या आठवणी ताज्या होत आहेत. मी नुकताच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता आणि मी अटलजींबरोबर रशियाला गेलो होतो. बहुधा, ही भारत-रशियाच्या सुरुवातीच्या वार्षिक शिखर परिषदांपैकी एक परिषद होती. ही परंपरा आजतागायत सुरु आहे.

माझ्या दौऱ्यामुळे भारत आणि रशिया दरम्यान आर्थिक ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ होईल. अन्य क्षेत्रांबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान, खाण क्षेत्रात आम्हाला सहकार्य वृध्दिंगत करायचे आहे. केवळ या दोन देशांसाठी नव्हे तर जगाच्या फायद्यासाठी भारत आणि रशिया आपले व्यापार संबंध आणखी वृध्दिंगत करु शकतात.

हा दौरा रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्याबरोबर होणाऱ्या व्यापक चर्चेचा साक्षीदार असेल रशियाच्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाईल. “फ्रेंडस ऑफ इंडिया” या कार्यक्रमात देखील मी सहभागी होणार आहे. मला खात्री आहे की या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या लोकांमधले संबंध जे आधीच मजबूत आहेत, ते आणखी नवी उंची गाठतील.

S.Kane/S.Tupe/M.Desai