Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियातील विविध प्रांतांच्या गवर्नर्ससोबत पंतप्रधान मोदी यांचा संवाद

रशियातील विविध प्रांतांच्या गवर्नर्ससोबत पंतप्रधान मोदी यांचा संवाद


रशियातील विविध प्रांतांच्या १६ गव्हर्नर्सशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला.
दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारतातील राज्ये आणि रशियातील प्रांत यांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी या भेटीत केला. गुजरातचे मुख्यमंत्री असतांना, २००१ साली रशियाच्या आस्त्राखान प्रांताला दिलेल्या भेटीच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

रशियातील प्रांत आणि भारतातील राज्यांमधल्या जनतेत सुसंवाद, सांस्कृतिक देवघेव आणि व्यापारी संबंध वाढवण्याची गरज आहे आणि त्यासाठीच्या संधी उपलब्ध आहेत, असे मत यावेळी विविध गव्हर्नरनी व्यक्त केले.

आंतरसंवाद कार्यक्रमात सामील झालेले गव्हर्नर खालील प्रमाणे –

अर्काहंगेल्सक ओब्लास्ट , अस्तरखान ओब्लास्ट, इर्कुटस्क प्रदेश, मॉस्को क्षेत्र, प्रिमोरी टेरिटरी, कल्मिकीया, रिपब्लिक ऑफ तातारस्तान, सेंट पीटर्सबर्ग, सखलिनस्वास्थ, स्वेर्दलोव्स्का, ओब्लास्ट, टॉस्लास्क ओब्लास्ट, तुवालियाब्लाब्स्क, उल्यानोव्स्क ओब्लास्ट, खाबरोव्स्की क्रै, चेल्याबिंस्क ओब्लास्ट आणि यरोस्लाव ओब्लास्ट.

B.Gokhale/R.Aghor/Anagha