Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाच्या उपपंतप्रधानांनी पंतप्रधानांची घेतली भेट

रशियाच्या उपपंतप्रधानांनी पंतप्रधानांची घेतली भेट


रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोझिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-रशिया आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीसाठी दिमित्री रोगोझिन भारत भेटीवर आले आहेत. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री या बैठकीचे सहअध्यक्ष आहेत.

भारत आणि रशिया यांच्यातल्या द्विपक्षीय सहकार्यात सर्वांगीण प्रगती होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. भारत आणि रशिया यांच्यातल्या राजनैतिक संबंधांची 70 वर्ष साजरी करण्यासाठी, उभय देशात वारंवार उच्च स्तरीय आदान प्रदान होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

B.Gokhale/ N.Chitale/D.Rane