नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2024
महामहिम,
तुमची मैत्री, हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी कझानसारख्या सुंदर शहराला भेट देण्याची संधी मिळाली याचा मला आनंद झाला आहे. या शहराचे भारताशी घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंध आहेत. कझानमध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास सुरू झाल्यामुळे हे संबंध आणखी दृढ होतील.
महामहिम,
गेल्या तीन महिन्यांतील माझी ही दुसरी रशिया भेट आपल्यातील घनिष्ठ समन्वय आणि गाढ मैत्री दर्शवते.जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या आपल्या वार्षिक शिखर परिषदेमुळे प्रत्येक क्षेत्रात आपले सहकार्य अधिक मजबूत झाले आहे.
महामहिम,
गेल्या वर्षभरात ब्रिक्सचे यशस्वीपणे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.गेल्या पंधरा वर्षांत,ब्रिक्सने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता जगभरातील अनेक देशांची यात सहभागी होण्याची इच्छा आहे.ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.
महामहिम,
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण नियमित संपर्कात आहोत. मी आधी म्हटल्याप्रमाणे,समस्यांचे निराकरण शांततापूर्ण मार्गानेच व्हायला हवे यावर आमचा विश्वास आहे.शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुन्हा प्रस्थापित व्हावे याचे आम्ही समर्थन करतो.आमचे सर्व प्रयत्न मानवतेला प्राधान्य देतात. भविष्यातही भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
महामहिम,
आज या सर्व मुद्यांवर आपले विचार मांडण्याची आणखी एक महत्त्वपूर्ण संधी आहे.पुन्हा एकदा,खूप खूप धन्यवाद.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Sharing my remarks during meeting with President Putin.https://t.co/6cd8COO5Vm
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2024