Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याकडून अध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन


रशियात काल झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे.

पुतीन यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि रशियातील विशेष तसेच खास राजनैतिक भागीदारी संबंध आणखी मजबूत होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारतात यावर्षी होणाऱ्या जागतिक वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांचे स्वागत करण्यास आपण उसुक असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या अभिनंदनाबद्द्ल पुतीन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारत रशियामधले सर्वाक्षेत्रीय संबंध अधिक मजबूत करण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे पुतीन यावेळी म्हणाले. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

***

बी. गोखले/ आर. अघोर