रशियाचे उपपंतप्रधान दिमित्रा रोगोझिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि रशिया यांच्यादरम्यान सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. तसेच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या वतीनेही यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या.
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीचे संबंध अडचणीच्या काळात अधिक मजबूत बनल्याचे मत व्यक्त करून उभय देशांमध्ये यापुढेही सर्व आघाड्यांवर सुदृढ संबंध प्रस्थापित करण्यावर भर असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
जूनमध्ये रशियाच्या दौऱ्यावर असताना अध्यक्ष पुतीन यांच्याशी केलेली बातचीत, चर्चा यांना पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. तसेच अगदी अलिकडेच या महिन्यात कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प, युनिट-1 चे लोकार्पण. पुतीन यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमाची आठवण पंतप्रधान मोदी यांनी केली. पुतीन यांनी लवकरच भारत दौरा करावा, भारत त्यांच्या येण्याची उत्सुकतेने वाट पहात असल्याची भावनाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
Discussed several aspects of India-Russia ties in my meeting with Deputy PM Dmitry Rogozin. https://t.co/2jPuFLmKHu
— Narendra Modi (@narendramodi) August 20, 2016