नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेचार वाजता, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील श्रम मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतील. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आंध्रप्रदेशात तिरूपती इथे, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी, ही परिषद आयोजित केली आहे.
भारतातील सहकार्यात्मक संघराज्य भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत, श्रम आणि कामगारांसंबंधीच्या विविध मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक चांगली धोरणे आखली जावीत, तसेच, कामगारांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढवण्यासही या परिषदेमुळे मदत होईल.
या परिषदेत, चार संकल्पनांवर आधारित सत्रे असतील. कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी ई-श्रम पोर्टलवर सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी उपलब्ध करुन देण्याविषयी; राज्यसरकार संचालित ईएसआय रुग्णालयांच्या माध्यमातून चालवली जाणारी, ‘स्वास्थ्य से समृद्धी’ योजना आणि त्याची पीएमजन आरोग्य योजनेशी सांगड घालणे, चार कामगार संहितांच्या अंतर्गत नियम निश्चित कारणे; व्हीजन श्रमेव जयते @2047, या चार संकल्पनांसह, कामाची समान परिस्थिती, सर्व कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, यात असंघटित आणि प्लॅटफॉर्म वर काम करणारे कुली, लैंगिक समानता, अशा विविध मुद्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai