Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युवा जागतिक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये 11 पदके मिळवल्याबद्दल भारताच्या कनिष्ठ आणि कॅडेट तिरंदाजांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 10 जुलै 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा जागतिक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये 11 पदके मिळवल्याबद्दल भारताच्या  कनिष्ठ आणि कॅडेट तिरंदाजांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे :

युवा जागतिक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये उज्ज्वल कामगिरी केल्याबद्दल आपल्या तिरंदाजांचे अभिनंदन. यांची कामगिरी भारतातील तिरंदाजीच्या भविष्यासाठी चांगली  असून ती उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देत राहील.