युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणविषयक उच्च प्रतिनिधी फेडरिका मोघेर्नी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.
परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांवर यावेळी चर्चा झाली. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातले सुरक्षा सहकार्य विशेषत: दहशतवादाला आळा घालण्यासंदर्भातले सहकार्य अधिक दृढ करण्याच्या गरजेवर या दोघांनी एकमत दर्शवले.
मागच्या भारत-युरोपियन महासंघ परिषदेसाठी मार्च 2016 मध्ये ब्रसेल्सला दिलेल्या भेटीचे स्मरण करतानाच येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या भारत-युरोपियन महासंघाच्या आगामी बैठकीसाठी आपण उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/Anagha