युरोपियन गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष डॉ. वॉर्नर होयर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी एक वर्षांपूर्वी भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेच्या वेळी युरोपियन गुंतवणूक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. नवी दिल्लीत बँकेचे विभागीय कार्यालय स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले होते. आज या कार्यालयाचे उद्घाटन झाले.
यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी वातावरण बदल आणि शाश्वत पर्यावरणाबद्दलच्या भारताच्या धोरणांबद्दल माहिती दिली. युरोपियन गुंतवणूक बँकेने लखनौ मेट्रोसह इतर शाश्वत पर्यावरण प्रकल्पांसाठी भारताला एक दशलक्ष युरोचे कर्ज दिले आहे.
वातावरण बदलाबाबत भारताच्या मजबूत आणि स्वयंप्रेरीत उपायांची प्रशंसा केली आणि या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांना बँकेचा सातत्याने पाठिंबा मिळत राहील असे स्पष्ट केले.
N.Sapre/S.Tupe/J.Patankar/Anagha