Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

युगांडाच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य


महामहिम अध्यक्ष मुसेवेनी

आदरणीय  मान्यवर,

माध्यम प्रतिनिधी,

हे माझे सौभाग्य आहे की, दोन दशकानंतर, पहिल्या द्विपक्षीय यात्रेसाठी भारताच्या पंतप्रधानांचे युगांडामध्ये  येणे झाले.

राष्ट्राध्यक्ष मुसेवेनी भारताचे खूप जुने मित्र आहेत. माझा सुद्धा  त्यांच्याशी खूप जुना संबंध आहे. वर्ष 2007 मध्ये जेंव्हा मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या रूपात इथे आलो त्यावेळच्या मधुर आठवणी  आजही ताज्या आहेत. आणि राष्ट्रपतींच्या उदार शब्दांनी तसेच उत्साहात केलेल्यास्वागत – सत्कार – सन्मानासाठी मी त्यांचे हृदयापासून आभार प्रकट करतो.

मित्रांनो,

भारत आणि युगांडा दरम्यानचे  ऐतिहासिक संबंध अनेक परीक्षांच्या धर्तीवर खरे उतरले आहे. युगांडाशी नेहमीच आमचे भावनिक संबंधराहिले आहेत आणि राहतील. युगांडाची आर्थिक प्रगती आणि राष्ट्रीय  विकासाच्या प्रयत्नांमध्ये भारताची सदैव साथ मिळाली आहे. प्रशिक्षण,क्षमता उभारणी, तंत्रज्ञान , पायाभूतता इत्यादी आमचे सहकार्याची प्रमुख क्षेत्र राहिले आहेत. भविष्यातही आम्हाला युगांडाच्या आवश्यकता आणिप्राथमिकतेनुसार आपले सहकार्य जारी ठेवण्यात येईल.

युगांडाच्या जनतेप्रति आमच्या मित्रतेच्या अभिव्यक्तीच्या रूपात भारत सरकारने युगांडा कॅन्सर इन्स्टिटयूट, कम्पाला येथे एकअत्याधुनिक कॅन्सर थेरपी मशीन  भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

मला हे ऐकून आनंद झाला कि, या मशीनच्या साहाय्याने न केवळ युगांडाच्या  मित्रांना परंतु  आफ्रिकन  देशांच्या मित्रांची गरज पूर्ण होईल.

युगांडा मध्ये ऊर्जा पायाभूतता आणि कृषी तसेच डेअरी क्षेत्र विकासासाठी आम्ही जवळपास दोन दशलक्ष डॉलर लागत मूल्य असलेल्यादोन पतसंस्थांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. हि समाधानाची बाब आहे की, सुरक्षा क्षेत्रातील आमचा सहभाग वृद्धिंगत होतो आहे. सैन्य प्रशिक्षण  क्षेत्रात आमच्या सहयोगाचा मोठा  इतिहास आहे. आम्ही हे सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी तयार आहोत. 

आम्ही युगांडा सेना आणि नागरी कामांसाठी  वाहने आणि ऍम्ब्युलन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापार आणि गुंतवणुकीतील आमचेसंबंध मजबूत होत आहेत. काल  राष्ट्राध्यक्षांना भेटून दोन्ही राष्ट्र प्रमुखांच्या व्यापारी नेतृत्वाना एकत्रित करून या संबंधांना अधिक मजबूतबनविण्यासाठी चर्चा करण्याची संधी आम्हाला  मिळेल.

मित्रांनो,

युगांडामध्ये राहणाऱ्या मूळ  भारतीय समाजाप्रति राष्ट्रपतींच्या स्नेहासाठी मी  त्यांचे हृदयापासून आभार मानतो. एका कठीण कालावधीनंतर , राष्ट्रपतीजीच्या कुशल आणि मजबूत नेतृत्वखाली  भारतीय मूळ समाज युगांडाच्या सामाजिक, आर्थिक जीवनात भरपूर योगदान देत आहे.मला समाधान आहे कि, आज संध्याकाळी मूळ भारतीयांसह समाजातील विविध कार्यक्रमात राष्ट्रपती समाविष्ठ होतील. त्यांच्या या विशेषजेक्सचर साठी मी संपूर्ण भारतातर्फे त्यांचे अभिनंदन करतो.

उद्या मला युगांडाच्या संसदेला संबोधित करण्याचे सौभाग्य मिळेल. हे सौभाग्य प्राप्त करणारा, मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे. याविशेष सन्मानासाठी राष्ट्रपती आणि युगांडाच्या संसदेचे हृदयापासून आभार व्यक्त करतो.

मित्रांनो,

भारत आणि युगांडा, दोन्ही युवा प्रधान देश असून दोन्ही सरकारांवर  युवकांच्या आकांशा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. आणि याप्रयत्नामध्ये  आम्ही एक दुसऱ्यांचा सहयोग देण्यासाठी पूर्णतः कटीबद्ध आहोत. सव्वाशे कोटी भारतीयांतर्फे मी युगांडाच्या लोकांच्या प्रगती आणिसमृद्धी साठी हार्दिक शुभेच्छा देतो.

धन्यवाद !

 

B.Gokhale/P.Malandkar