Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

म्यानमार संरक्षण सेवेचे कमांडर-इन-चीफ सिनियर जनरल यु मीन आँग ल्हीआंग यांची पंतप्रधानांशी बातचीत


म्यानमार संरक्षण सेवेचे कमांडर-इन-चीफ सिनियर जनरल यु मीन आँग ल्हीआंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली.

अमरनाथच्या यात्रेकरुंवर नुकत्याचा झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत जनरल यु मीन आँग ल्हीआंग यांनी या हल्ल्यात बळी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला.

7 जून 2017 रोजी झालेल्या दुर्देवी विमान अपघातात दगावलेले म्यानमारच्या लष्करी दलाचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

जनरल यु मीन आँग ल्हीआंग यांनी पंतप्रधानांना द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याबद्दल माहिती दिली. भारत आणि म्यानमारच्या लष्करातील निकटच्या सहकार्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

म्यानमार हा भारताच्या “ॲक्ट इस्ट” धोरणाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे सांगत सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय नातेसंबंध अधिक बळकट करण्याची वचनबद्धता पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar