Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता


नवी दिल्‍ली, 27 मार्च 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपांबद्दल चिंता व्यक्त केली.

या आपत्तीमुळे बाधित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि क्षेमकुशलतेसाठी त्यांनी मनापासून प्रार्थना केली. या कठीण प्रसंगामध्‍ये म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांना आणि लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास भारत सज्ज असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

‘एक्स’ या समाजमाध्‍यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी  आपल्याला चिंता वाटते. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि क्षेमकुशलतेसाठी प्रार्थना करत आहे. या संकटसमयी  भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात, आमच्या संबंधित  अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.  तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला  म्यानमार आणि थायलंड सरकारांशी संपर्कामध्‍ये  राहण्यास सांगितले.”

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai