म्यानमारमधल्या तामू-कायगोन-कालेवा रस्ते विभागात 69 पूल बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली असून यासाठी 371.58 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे प्रस्तावित इंफाळ-मंडाले बससेवेचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि म्यानमार यांच्यातले दळणवळण वाढणार असून माल आणि वाहतुकीची ने-आण वाढणार आहे. 2019 च्या मध्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
इंजिनियरिंग प्रोक्युरिंग ॲन्ड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) द्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
N.Chitale/M.Desai