Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नागरिकांनी केलेले ट्विट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक


 

मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नागरिकांनी केलेले ट्विट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहेत. 2014 पासून सरकारची नागरिकांना भावलेली कौतुकास्पद कामगिरी  या ट्विट संदेशात अधोरेखित करण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

सकाळपासून, मी मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कारकिर्दी बाबत अनेक ट्विट संदेश पाहत आहे, ज्यात 2014 पासून नागरिकांना या सरकारची आवडलेली कामगिरी अधोरेखित करण्यात आली आहे. असा स्नेह मिळाल्याने नेहमीच नम्रतेची अनुभूती येते आणि यातून मला लोकांसाठी आणखी कठोर परिश्रम करण्याची शक्ती देखील मिळते.”

नागरिकांनी केलेले ट्विट संदेश सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले:

गेल्या 9 वर्षात आपण खूप मोठी झेप घेतली आहे आणि आपणाला पुढील काळात आणखी बरेच काही करायचे आहे जेणेकरून आपण स्वातंत्र्याच्या अमृत काळात एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करू शकू.”

आम्हाला अशी कामगिरी करणे यामुळे शक्य झाले आहे कारण भारतातील जनतेने एक स्थिर सरकार निवडून दिले आहे, जे आपली प्रमुख आश्वासने पूर्ण करण्यास सक्षम राहिले आहे. अशाप्रकारे मिळणारा प्रचंड पाठिंबा हाच आमच्या ताकदीचा खरा स्रोत आहे.

एनडीए सरकारने, नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.”

आपण महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि जीवन सुखकर करणारे  प्रकल्प अधोरेखित केले आहेत जे  तळागाळापर्यंतच्या विकासात खूप  प्रभावी आहेत.”

“140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी मिळाल्याने मी खरोखरच आपला ऋणी आहे.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai