हिमाचल प्रदेशातील सिमला येथील रोहरूच्या प्राथमिक शाळेत विविध कामे करणाऱ्या कुशला देवी 2022 पासून तिथे पाणक्या (जलवाहक) म्हणून कार्यरत आहेत. दोन मुलांचे एकटे पालकत्व निभावणाऱ्या कुशला देवी यांना पीएम आवास योजने अंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी 1.85 लाख रुपयांचे सहाय्य मिळाले. त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतात कारण त्यांची काही जमीन देखील आहे.
जीवनातील समस्यांचा निकराने सामना केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. कुशला देवी यांनी सांगितले की त्यांची मुले शिक्षण घेत आहेत आणि घर मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. पंतप्रधानांनी त्यांना जिद्द कायम ठेवून मुलांना आणि त्यांना मदतगार ठरणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी ‘मोदी की गॅरंटी की गाडी’ मधून सर्व माहिती जाणून घेण्यास कुशलादेवींना सुचवले. पंतप्रधान म्हणाले कि “गेल्या 9 वर्षांतील सर्व योजना महिला केंद्रित होत्या. तुमच्यासारख्या स्त्रिया आम्हाला चांगले काम करत राहण्यासाठी बळ देतात.”
***
S.Kane/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai