Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोटार वाहन (सुधारणा) विधेयक 2016 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटार वाहन (सुधारणा) विधेयक 2016 ला मंजुरी दिली आहे.

देशभरात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघातात होतात, ज्यामध्ये दीड लाख लोक मरण पावतात. येत्या पाच वर्षात अपघातांचे प्रमाण कमी करुन जीवितहानी 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी सरकार कटिबध्द आहे.

रस्ते सुरक्षेचा मुद्दा आणि नागरिकांच्या सुविधेसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यांच्या परिवहन मंत्र्यांचा गट स्थापन केला. राजस्थानचे परिवहन मंत्री युनूस खान यांच्या अध्यक्षतेखाली या गटाच्या तीन बैठका झाल्या. त्यांनी आपला अंतरिम अहवाल सादर केला. या गटाने केलेल्या शिफारशींच्या आधारे मोटार वाहन (सुधारणा) विधेयक 2016 मंत्रिमंडळाने या विधेयकाला आज मंजुरी दिली.

सध्याच्या मोटार वाहन कायद्यात 223 कलमे आहेत त्यापैकी 68 कलमांमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या.

हिट अँड रन प्रकरणी देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कम 25 हजारांवरुन 2 लाख रुपये करण्यात आली आहे. मृत्यू झाल्‍यास 10 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल.

BG/SK/AK