Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि केनिया देशांच्या भेटीपूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि केनिया या दोघांना भेटी देण्यासाठी रवाना होत असून त्यापूर्वी त्यांनी निवेदन दिले आहे.

गुरुवार, 5 जुलै रोजी मी मोझांबिकमध्ये असणार आहे. या देशाशी सहकार्य वृध्दीबरोबरच सांस्कृतिक बंध दृढ करण्याचा उद्देश आहे. मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिपे नाययुसी यांची भेट घेऊन मी बातचीत करणार आहे.

इतर कार्यक्रमामध्ये नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षा श्रीमती वरोनिका मकामो यांची भेट घेणार आहे. मलौनाच्या एस ॲण्ड टी पार्कलाही भेट देणार आहे. येथे काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. तसंच तेथील भारतीय रहिवाशांशीही संवाद साधणार आहे. 7 जुलैच्या संध्याकाळी मी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे पोहोचणार आहे. दक्षिण आफ्रिका आपल्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार देश आहे. ऐतिहासिक दृष्टीनेही या देशाशी आपले संबंध घट्ट आहेत. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया, जोहान्सबर्ग, दरबान आणि पीटर मॅरिट्झबर्ग या शहरांना मी भेट देणार आहे. महात्मा गांधीजींचे वास्तव्य दक्षिण आफ्रिकेत होते. त्यामुळे भारताच्या दृष्टीने या इतिहासाला महत्त्व आहे. गांधीजी तिथे वकिली करण्यासाठी गेले आणि मानवतेच्या मूल्यांचा एक दृढ आवाज बनून भारतात परतले.

या दौऱ्यात मी फोनिक्स सेटलमेंट आणि पीटर मॅरिट्झबर्ग स्थानकाला भेट देणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील या दोन्ही स्थानांचा आणि महात्मा गांधीजी यांचा ऋणानुबंध आहे. त्याचबरोबर मदिबा यांच्या स्मरणाशिवाय दक्षिण आफ्रिकेची भेट अपूर्ण ठरणार आहे. या भेटीत मी टांझानियाचे अध्यक्ष डॉ. जॉन पगुफुली यांच्याशी बातचीत करणार आहे. आफ्रिकेतील या दौऱ्यात मी सौर संयंत्रणेत कार्यरत असणाऱ्या समुहाला भेटणार आहे. आफ्रिकेत ग्रामीण भागातील महिला सौर अभियंता कार्यरत आहेत. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिला सौर ऊर्जा संयंत्र बसवणे, त्याचा वापर करण्यास शिकवणे, दुरुस्ती करणे आणि आवश्यक ती सर्व कार्य करतात. त्यांच्या गावामध्ये सौर कंदील, सौर दिवे घराघरात वापरले जातात. या सौर ऊर्जा क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना भेटण्यास मी उत्सुक आहे.

याचबरोबर भारतीय समाजाशीही मी संवाद साधणार आहे.

केनियाच्या माझ्या भेटीला दि.10 जुलैला सुरुवात होणार आहे. केनिया आणि भारत या दोन्ही देशांनी मागील शतकात वसाहतवादाशी तीव्र लढा दिला आणि या संघर्षात ते यशस्वीही झाले. स्वातंत्र्यलढ्यात दोन्ही देशांनी अग्निपरिक्षेमुळेच उभय देशातील जनतेमध्ये खूप मजबूत नाते निर्माण झाले आहे.

भारत आणि केनिया यांच्यातील द्विपक्षीय सहकार्यात वृध्दी करण्याविषयी केनियाचे अध्यक्ष उहूस्न केन्याता यांच्याशी मी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहे. व्यापार, व्यावसायिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण भारत आणि केनिया यांच्यादरम्यान व्हावी, असे मला वाटते. त्यादृष्टीने केनियाची ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नैरोबीमध्ये मी महात्मा गांधीजींना पुष्पांजली अर्पण करणार आहे. तसेच केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष मझी जोमो केन्याता यांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहे.

केनियाशी आर्थिक संबंध अधिक दृढ करणे हा दौऱ्याचा महत्त्वपूर्ण हेतू आहेच.

या दौऱ्यात नैरोबी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासही मी खूप उत्सूक आहे. तसेच 10 जुलै रोजी एका सामाजिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहे.

S.Bedekar/B.Gokhale