Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोझांबिकच्या राष्ट्रीय विधानसभेला पंतप्रधानांची भेट; मलौनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यानात विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मापुटो येथील मोझांबिकच्या राष्ट्रीय विधानसभेला भेट दिली. त्यांनी यावेळी श्रीमती बेरोनिका माकामो यांच्याशी चर्चा केली.

पंतप्रधानांनी मलौना येथे विकसित केलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यानालाही भेट दिली. या तंत्रज्ञान केंद्रामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव ऐकले. भारतीय शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचीही पंतप्रधानांनी यावेळी भेट घेतली.

मापुटोमधील भारतीय समाजाशी पंतप्रधानांनी संवाद साधला. गेली अनेक पिढया भारतीय परंपरा जतन केल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी तेथील भारतीयांबद्दल प्रशंसोद्‌गार काढले.

S.Bedkar/B.Gokhale