नवी दिल्ली, 10 मार्च 2025
माझे मित्र पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगोलम यांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत मी मॉरीशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यासाठी रवाना होत आहे.
मॉरीशस आपला जवळचा सागरी शेजारी देश असून हिंदी महासागरातील महत्त्वाचा भागीदार तसेच आफ्रिका खंडाकडे जाण्याच्या मार्गावरील प्रवेशद्वार आहे.आपले देश इतिहास, भूगोल आणि संस्कृती यांच्या माध्यमातून जोडलेले आहेत. परस्परांवरील दृढ विश्वास, लोकशाहीच्या मूल्यांवरील सामायिक श्रद्धा आणि आपल्या वैविध्याचा उत्सव हे आपले सामर्थ्य आहे. लोक केंद्रित उपक्रमांसह गेल्या दहा वर्षांत आपण लक्षणीय प्रगती केली आहे.
आमच्या सागर या संकल्पनेचा भाग म्हणून दोन्ही देशांतील जनतेच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षितता आणि विकासासाठी आमची भागीदारी तिच्या सर्व आयामांच्या बाबतीत उंचावणे तसेच आमची शाश्वत मैत्री आणखी बळकट करणे या उद्देशासह मॉरीशसच्या नेतृत्वाशी संवाद साधण्याची संधी मिळण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.
ही भेट भूतकाळाच्या मजबूत पायावर आधारलेली असेल आणि याद्वारे भारत-मॉरीशस मैत्रीचा नवा तसेच अधिक उज्ज्वल अध्याय सुरु होईल असा विश्वास मला वाटतो.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai