Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मॉरिशस येथे माध्यमांना संबोधताना पंतप्रधानांनी केलेले विधान


s2015031262963 [ PM India 116KB ]

s2015031262962 [ PM India 183KB ]

पंतप्रधान सर अनिरुद्ध जगन्नाथ व उपस्थित माध्यम प्रतिनिधी, माझे विनम्र स्वागत व विलक्षण आदरातिथ्य केल्याबद्दल मी आपला आभारी आहे.

उद्या होणाऱ्या राष्ट्रीय दिवसाच्या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून मला निमंत्रित केल्याबद्दल मी आपला व मॉरिशसच्या नागरिकांचा ऋणी आहे.

हा १.२ अब्ज भारतीयांचा सन्मान आहे जे या नात्याचा आदर करतात .

हे नाते आमच्या अंतःकरणातून व परस्परांच्या सखोल बंधातून फुलले आहे.

एकता व परस्पर सहकार्य या दोन्हींचे आम्ही सदैव समर्थन करतो. आमच्यातील मैत्री, सामायिक मुल्ये, समान प्रादेशिक व जागतिक हितसंबंध यामुळे हे हितसंबंध नैसर्गिकरित्या विकसित झाले आहेत.

परस्परांच्या आर्थिक प्रगतीत आम्ही भागीदार आहोत.

आम्ही अद्वितीय शक्ती व चारित्र्यातून हे नाते निर्माण केले आहे.

यामुळेच पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ व माझ्यात उत्कृष्ठ चर्चा झाली ह्यात काही नवल नाही. आजच्या चर्चेतून झालेले निर्णय हे खरोखर लक्षणीय आहेत.

आम्ही सुरक्षित हिंदी महासागर व स्थिर व समृद्ध हिंदी महासागर प्रदेश यांतील सामायिक बाबींवर चर्चा केली. या प्रदेशातील मॉरिशसचे नेतृत्व आम्हाला महत्वाचे वाटते .

नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मॉरिशसला सवलतीच्या दरात 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्जपुरवठा करताना मला आज आनंद झाला आहे.

मॉरिशसमध्ये लवकरच पेट्रोलियम साठवणूक केंद्र व बंकरिंग सुविधा तयार करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे मॉरिशसलाच केवळ फायदा होणार नसून एक प्रादेशिक हब म्हणून मॉरिशसची भूमिका यामुळे बळकट होणार आहे.

एका दशकापूर्वी, मॉरिशसमध्ये पहिली सायबर सिटी विकसित करण्यात भारताने मदत केली होती याच्या उल्लेखनीय यशातून अर्थव्यवस्थेचे वैविध्य जपण्यात मॉरिशसने अंगीकारलेली धोरणात्मक दृष्टी प्रतिबिंबित होते. आज आम्ही दुसरी सायबर सिटी विकसित करण्यासाठी मॉरिशसला मदत देऊ केली आहे.

‘अगालेगा’ बेटाच्या विकासासाठी आमच्यात झालेला करार हा पायाभूत क्षेत्रातील सहकार्याचे मोठे यश आहे. आमच्या एकमेकांवरील विश्वासाचे हे प्रतीक आहे.

सागरी अर्थव्यवस्था विकसित करण्यात मॉरिशसने व्यापक दृष्टी दाखविली आहे.

आमच्यात झालेला महासागरीय अर्थव्यवस्था सहकार्य करार हा आमच्या वैज्ञानिक व आर्थिक भागीदारीतील महत्वाचे पाऊल आहे.

यामुळे आमच्या सागरी पर्यावरणाबाबतच्या जाणीवा वृद्धिंगत होतील.

महासागरीय अर्थव्यवस्थेतील नवनवीन क्षेत्रे विकसित करण्यात व नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून जास्तीत जास्त शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास यामुळे आम्हाला मदत होणार आहे.

गेली अनेक वर्ष आम्ही दुहेरी करप्रणाली प्रतिबंध पद्धतीच्या पुनरावृत्तीवर (रिव्हिजन ऑफ डबल टॅक्सेशन अव्होइडन्स कन्व्हेन्शन) चर्चा केली आहे. या पद्धतीतून मॉरिशसला जास्तीत जास्त फायदा व्हावा व ह्या पद्धतींचा दुरुपयोग होऊ नये हे आमचे सामायिक उद्दिष्ट आहे. आम्ही ही चर्चा सुरु ठेवण्याचे मान्य केले आहे.

जगातील आमच्या सामर्थ्यशील भागीदारांपैकी एक असलेल्या मॉरिशसच्या क्षेत्राला कोणतीही आमच्याकडून कोणतीही हानी होणार नाही असे आश्वासन मी पंतप्रधानांना दिले आहे.

करप्रणालीवरील माहिती हस्तांतरणासाठी मॉरिशसने देऊ केलेल्या समर्थन व सहकार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. सर्वंकष आर्थिक भागीदारी कराबाबत आम्ही पुन्हा चर्चा सुरु केली पाहिजे.

आमच्यातील सुरक्षा सहकार्य हे आमच्या भागीदारीतील सर्वात महत्त्वपूर्ण बाब असल्याचे आम्ही मानतो.

हे महत्व केवळ आमच्या एकमेकांवरील जबाबदारीमुळे नसून सागरी शेजारातील आमच्या सामायिक दृष्टीमुळे आहे.

अफाट विशेष आर्थिक क्षेत्र सुरक्षित करण्याच्या मॉरिशसच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी भारताच्या बांधिलकीचा मी पुनरुच्चार करतो.

सुरक्षा क्षमता विकसित करण्यासाठी मॉरिशसचा प्राधान्य भागीदार झाल्याबद्दल मला आनंद होत आहे. ‘बॅराक्युडा’ उद्या मॉरिशस तटरक्षक दलाच्या सेवेत समाविष्ट होणार आहे.

मॉरिशसला इतर जहाजे व उपकरणांचे वेळेवर वितरण करण्याचे मी आदेश दिले आहेत. याशिवाय, सर्व क्षेत्रात आवश्यक मदत करण्याचे आश्वासन मी पंतप्रधानांना दिले आहे.

विस्तृत प्रांतिक सहकार्यातून आमच्या सागरी प्रदेशात शांतता आणि समृद्धी येईल यावर आम्ही सहमत आहोत.

या संदर्भात, हिंदी महासागर रिम असोसिएशन आणि त्याच्या सचिवालयाचे यजमानपद स्वीकारण्यात मॉरिशसने दर्शवलेल्या नेतृत्वाबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मॉरिशसने आम्हाला नेहमीच दिलेल्या समर्थनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यामुळे सामायिक हितसंबंधांच्या विषयांवर बोलण्यासाठी भारताल बळ मिळते.

संयुक्त राष्ट्रसंघांच्या सर्वसाधारणसभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय हा आपल्या सामायिक वारशाला त्यांनी केलेला सलाम आहे.

आमच्यात हवामान बदलांवर जोरदार चर्चा झाली. यावर कठोर राष्ट्रीय कार्यवाही करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

याशिवाय, आम्ही हवामान बदलाची आव्हाने समजून घेऊन आमच्यातील द्विपक्षीय सहकार्य आणि जागतिक भागीदारी मजबूत करू.

जनतेचा जनतेशी संवाद हा आमच्या संबंधांचा मुख्य आधार आहे.

आम्ही मॉरिशसला समृध्द करण्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देउ आम्ही मॉरिशसाठी इलेक्ट्रॉनिक प्रवास प्राधिकृत शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही एक बहुविषयक युवक मंच स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांतील युवक अधिक जवळ येतील आणि यामुळे भविष्यातील सशक्त भागिदारीचे बीज पेरले जाईल.

मी अतिशय परिणामकारक आणि अर्थपूर्ण बैठकीसाठी पंतप्रधान सर जगन्नाथ आणि त्यांच्या पक्षाप्रती आभार व्यक्त करतो. मी राष्ट्रीय दिन समारंभाबाबत उत्सुक आहे. याशिवाय राष्ट्रीय विधानसभेला संबोधित करण्याबाबत तसेच उदयाच्या विशेष कार्यक्रमांबाबत उत्सुक आहे.

माझ्यासाठी हे सर्व आपल्या संबंधांच्या समृध्दीचे द्योतक आहे.

मी पुन्हा एकदा मॉरिशसच्या पंतप्रधानांचे आभार मानतो.