पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माईलेन लक्झेम्बर्ग एस ए आर एल वा माईलेन समूह बी वी नेदरलँडस कडून माईलेन लॅबोरेटरीज लिमिटेड मध्ये 750 दशलक्ष अमेरिकी डॉलरपर्यंत प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक वाढीसाठी, समभाग आणि परिवर्तनीय कर्जरोखे यांच्या माध्यमातून भागधारकांपासून विभक्त झाल्यानंतर जेपीएलच्या पूर्ण भागीदारीच्या मालकीसाठी आवश्यक रक्कमेचा वाटा देण्यासाठी, आर्थिक बाबींवरील विभागाच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. या भागधारकांमध्ये ओरीजाबा आणि निवासी भारतीय भागधारक यांचाही समावेश आहे.
या मंजूरीनंतर देशात 750 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची प्रत्यक्ष गुंतवणूक होणार आहे. ही मंजूरी खालील शर्तींवर आधारित आहे.
(1) परकीय गुंतवणुकीच्या वेळी उपयोग्य वस्तूंची उत्त्पादन पातळी तसेच एनएलईएमची औषधे आणि घरगुती बाजारपेठेत त्याचा पुरवठा पुढील पाच वर्षांसाठी स्थिर ठेवला जाईल. यापातळीवरील मानकांचा निर्णय, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकीवेळेचे वर्ष, यानंतर सलग तीन वर्षांपैकी ज्या वर्षांमध्ये वापरासाठी योग्य साधनसामग्री वा एनएलईएम औषधांच्या उत्पादनाच्या स्तरासंबंधी केला जाईल. या तीन वर्षांपैकी ज्यावर्षी सर्वात अधिक उत्पादन झाले असेल ते वर्ष उत्पादन पातळीसाठी ग्राह्य धरले जाईल.
(2) संशोधन आणि विकासखर्चासाठी प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीपासून पाच वर्षापर्यंत, एका तटस्थ पातळीवर, मुल्याच्या संदर्भात ठेवले जाईल. याचे निकष ठरवण्यासाठी प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीच्या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही वर्षात संशोधन आणि विकासासाठी सर्वाधिक खर्च झाला असेल ते वर्ष निश्चित केले जाईल.
(3) संबंधित प्रशासनिक मंत्रालय आणि एफआईपीबी सचिवालय, गुंतवणूक होणाऱ्या कंपनीत परकीय गुंतवणूकीच्या तंत्रज्ञानासह, औद्योगिक हस्तांतरणासंबंधीची तपशीलवार माहिती प्रदान करेल.
(4) प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक प्राप्त करणारी कंपनी, पुढील पाच वर्षापर्यंत मागील तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षातील उच्चतम पातळीवरील उत्पादनाच्या स्तरावर, घरगुती क्षेत्रांसाठी एनएलईएम अंतर्गत औषधांचे उत्पादन सुरू ठेवेल.
(5) कंपनीमध्ये प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक होण्यापूर्वीची तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही वर्षात केलेल्या संशोधन आणि विकासासाठीच्या अधिकतम खर्चासाठीची पातळी कायम राखणे आवश्यक असेल. हीच निरपेक्ष पातळी आगामी पाच वर्षांसाठी ठेवली पाहिजे.
(6) “संभाव्य गुंतवणूकदार” आणि “संभाव्य प्राप्तकर्ता” उद्योग यासंबंधी कोणतीही स्पर्धात्मक अट वा उपनियम असणार नाही.
(7) देवाणघेवाणीच्या दुसऱ्या टप्प्यात मेसर्स जय फार्मा लिमिटेडचे समभाग मिळवण्यासाठी माईलेन समुहाकडून परकीय निधी आणावा लागणार आहे. या देवाणघेवाणीत होणारा नफा कर देयता क्षेत्राकडून पडताळून पाहिला जाईल.
(9) परकीय गुंतवणूकदाराकडून समभागांच्या परताव्यावरील करपात्र लाभांश आणि भविष्यात भांडवली उत्पन्न, व्याजाच्या रुपात मिळणारे उत्पन्न आणि इतर कोणत्याही प्रकारे मिळणारा लाभ या व्यवहारातील तथ्य पाहता, आयकर नियम 1961 च्या कलमांनूसार आणि डीटीएए नूसार, क्षेत्र निश्चित करुन तपास केला जाईल.
(10) आयकर अधिनियम वा संबंधित डीटीएए अंतर्गत कोणत्याही प्रकारचे कर सुटका दाव्यांची योग्यता आणि सीमा यांचे परीक्षण अधिकरणाकडून स्वतंत्र प्रकारे केले जाईल आणि अशा प्रकारच कोणतेही अनुमोदन, सवलत देण्यायोग्य असणार नाही.
(11) समर्थन निश्चित करण्यासाठी कर तपासणीपासून कसल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
(12) एफआयपीबीच्या निर्देशांनूसार निर्धारित केलेली विविध देयके, सेवा, संपत्ती, समभाग इत्यादींचे योग्य बाजारमूल्य, कर कायदे आणि नियमांअतर्गत कर अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाईल आणि कर उद्देशानूसार त्यात बदल केला जाईल.
S.Thakur/S.Tupe/N.Sapre