Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मेदीपार्क उभारण्याकरिता मे.एच.एल.एल लाईफकेअर मर्यादीतला 330.10 एकर जमीन भाडे तत्वावर द्यायला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी


वैद्यकीय उपकरण उत्पादन पार्क (मेदीपार्क) उभारण्याकरीता आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या मे.एच.एल.एल लाईफकेअर मर्यादीतला चेन्नई च्या सीमेलगत चेगलपट येथे असणारी 330.10 एकर जमीन भाडेतत्वावर द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळात आज मंजूरी दिली. या प्रकल्पामध्ये एच एल एल 90 टक्क्यांहून अधिकची समभागधारक असेल.

मेदीपार्क प्रकल्प हा देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिला उत्पादन समूह असणार आहे. यामुळे कमी खर्चात स्थानिक पातळीवर उत्पादन निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, जेणेकरुन सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध होईल. प्रस्तावित मेदीपार्क वैद्यकीय उपकरणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासामध्ये योगदान देईल यामुळे सरकारच्या “मेक इन इंडिया” अभियानाला देखील प्रोत्साहन मिळेल.

मेदीपार्क टप्प्याटप्प्याने विकसित केले जाईल. हा प्रकल्प पूर्ण व्हायला 7 वर्षांचा कालावधी लागेल.

B.Gokhale/S.Mhatre/V.Deokar