Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मूलभूत आणि संशोधनात्मक वैज्ञानिक संशोधनासंदर्भात भारत रशिया यांच्यात सहकार्यविषयक करार


मूलभूत आणि संशोधनात्मक विज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय आणि रशियन संशोधकाच्या संशोधन प्रकल्पाच्या संयुक्त अंमलबजावणीसाठी स्पर्धात्मक संशोधन अनुदान पुरविणारा करार भारत आणि रशिया यांच्यात मे 2015 मध्ये झाला. त्या करारावर स्वाक्षऱ्या केल्‍याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशंसा करण्यात आली.

सहा वर्षांसाठी हा करार करण्यात आला असून विज्ञान, तंत्रज्ञान खाते डीएसटी आणि रशियन सायन्स फेडरेशन आर एस एफ यांच्या परस्पर संमतीने या कराराचा कालावधी वाढविता येऊ शकतो. गणित, संगणक आणि सिस्‍टीम सायन्स, अंतराळ विज्ञान, रसायन शास्त्र, औषध क्षेत्रातले मूलभूत संशोधन, कृषी विज्ञान, अभियांत्रिकी विज्ञान या क्षेत्रात स्पर्धा होणार आहेत. निधीसाठीचे प्रकल्प निश्चित करण्याचा निर्णय डीएसटी आणि आर एस एफ संयुक्तपणे घेतील. या सहकार्यामुळे संयुक्त वैज्ञानिक प्रकाशन, मनुष्यबळ प्रशिक्षणाला चालना मिळणार आहे.

N.Chitle/S. Tupe/M. Desai