Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुद्रा योजनेची दहा वर्षे सक्षमीकरण आणि उद्यमशीलतेची- पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2025

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या दशकपूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. “सक्षमीकरण आणि उद्यमशीलता” यांचा हा दहा वर्षांचा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य पाठबळ मिळाले तर भारताचे लोक चमत्कार करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

ही योजना सुरू झाल्यापासून 33 लाख कोटी रुपये मूल्याची 52 कोटींपेक्षा जास्त तारणविरहित कर्जे वितरित केली आहेत, ज्यामध्ये सुमारे 70% वाटा महिलांचा आहे तर 50% अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती  /इतर मागास वर्ग उद्योजकांना योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेने 10 लाख कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे पहिल्यांदाच उद्योग सुरू करणाऱ्यांचे सक्षमीकरण केले आहे तर पहिल्या तीन वर्षात 1 कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्माण केले आहेत. सुमारे सहा कोंटीपेक्षा जास्त कर्जे मंजूर करून, देशभरात उद्यमशीलतेच्या अतिशय तीव्र भावनेचे दर्शन घडवत बिहार सारखी राज्ये नेतृत्व करणारी राज्ये म्हणून उदयाला आली आहेत.

लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यामध्ये मुद्रा योजनेच्या मध्यवर्ती भूमिकेविषयी मायजीओव्हीइंडियाच्या थ्रेडना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले,

“#10YearsofMUDRA ही सक्षमीकरण आणि उद्यमशीलतेची आहेत. या योजनेने हे दाखवून दिले आहे की योग्य पाठबळ दिले तर भारताचे लोक चमत्कार घडवू शकतात!”

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai