Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईत विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांचे प्रधान सचिव सहभागी


नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी आज मुंबईत गोरेगाव पूर्व येथे विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले. ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत  काही लाभार्थ्यांनी पीएम मुद्रा योजना, पीएम स्वनिधी, पीएम एफएमई, आयुष्मान भारत आणि इतर योजनांनी त्यांच्या जीवनात कशाप्रकारे  सकारात्मक बदल  आणला याबद्दल त्यांचे अनुभव कथन केले.  या कार्यक्रमात मिश्रा यांनी काही लाभार्थ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांना विविध सरकारी योजनांच्या लाभार्थी पत्रिका वितरित केल्या.

PM India

प्रत्येक भारतीयाने भारताला 2047 पर्यंत विकसित बनवण्याचा संकल्प केला पाहिजे, असे ते म्हणाले. 2047 पर्यंत  भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आहे आणि यामध्ये केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर सर्व नागरिक सहभागी होतील, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला. ही संकल्प यात्रा लोकांमध्ये  विकसित भारत@ 2047 चे उद्दिष्ट साध्य करत असल्याचा विश्वास निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले.

PM India

विकसित भारत संकल्प यात्रा हे जन भागिदारीचे प्रतीक बनले आहे असे ते  म्हणाले. जनभागीदारी किंवा लोकसहभागामुळे देशाला मागील काळात  मोठी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत झाली आहे. स्वच्छ भारत आणि हर घर तिरंगा यांसारख्या मोहिमा आणि कोविड-19 व्यवस्थापन हे सगळ्या  नागरिकांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे यशस्वी झाले असे ते म्हणाले. आजपर्यंत, 9 कोटी लोक विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले आहेत आणि दिवसेंदिवस अधिकाधिक लोक या संकल्प यात्रेत सहभागी होत आहेत.विकसित भारत संकल्प यात्रा  आत्तापर्यंत 1.5 लाखांहून अधिक ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रात पोहोचली आहे असे त्यांनी नमूद केले.

PM India

विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये  मुंबईच्या विविध भागांमध्ये लोक  उत्साहाने  मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याबद्दल  आणि महाराष्ट्रातील लोक राज्यभरात मोठ्या प्रमाणात विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये  सहभागी होत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली, असे मिश्रा यांनी सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रेचे यशस्वी आयोजन केल्यबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, प्रशासक आणि परिसरातील जनतेचे त्यांनी अभिनंदन केले.

* * *

S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai