Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या नागरिकांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘स्थापना दिनानिमित्त मिझोराममधल्या नागरिकांना शुभेच्छा. या राज्याच्या समृद्ध संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. मिझोराममधल्या नागरिकांनी अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे आणि देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे. आगामी काळात मिझोरामच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो.

अरुणाचल प्रदेशमधल्या नागरिकांना स्थापना दिवसानिमित्त शुभेच्छा. देशभक्ती आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी प्रतिबद्धता यांचे प्रतीक असलेले राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची निरंतर प्रगती होत राहो, यासाठी प्रार्थना करतो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kakade/P.Kor