पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीझालेल्या बैठ्कीत केंद्रीय मंत्रिमंडळाने चालू वर्षात मालदीवच्या अड्डू सिटी येथे भारताचे नवीन वाणिज्य दूतावास उघडायला मंजुरी दिली.
भारत आणि मालदीवमध्ये प्राचीन, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. भारत सरकारच्या ‘शेजारी प्रथम धोरण ’ आणि ‘सागर’ (सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन ) संकल्पनेत मालदीवचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
अड्डू सिटीमध्ये वाणिज्य दूतावास उघडल्यामुळे मालदीवमध्ये भारताची राजनैतिक उपस्थिती वाढण्यास आणि विद्यमान तसेच महत्वाकांक्षी सहभागाशी सुसंगत बनवण्यात मदत होईल.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती सोलिह यांच्या नेतृत्वात द्विपक्षीय संबंधातील गती आणि उर्जा अभूतपूर्व पातळीवर पोहोचली आहे.
आपल्या वृद्धी आणि विकासाचा राष्ट्रीय प्राधान्यक्रम किंवा ‘सबका साथ सबका विकास’ च्या दिशेने हे एक पुरोगामी पाऊल आहे. भारताची राजनैतिक उपस्थिती वाढल्यास भारतीय कंपन्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि वस्तू व सेवांच्या भारतीय निर्यातीला चालना मिळेल. स्वयंपूर्ण भारत किंवा ‘आत्मनिर्भर भारत’ या आपल्या उद्दिष्टाच्या धर्तीवर देशांतर्गत उत्पादन व रोजगाराच्या वाढीवर याचा थेट परिणाम होईल.
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com