Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले भाषण

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले भाषण


राष्ट्रपती अब्दुल यामीन जी आणि प्रसार माध्यमातल्या माझ्या सहकाऱ्यांनो भारत आणि मालदीव यांच्या सहकार्याच्या इतिहासातील आजचा हा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे.

आपल्या या भारत भेटीमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो. दिल्ली मधली आपली उपस्थिती, माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या येण्यामुळे एका मित्राच्या येण्याची अनुभुती मिळते आहे.

मालदीव भारताच्या सर्वाधिक घनिष्ट मित्रांपैकी एक आहे. संस्कृतीचे पुरातन बंध, दोन्ही देशांतील लोकांमध्ये असलेला आपसातील ताळ-मेळ आणि हिंदी महासागराच्या लाटा, आपल्याला जोडतात.

महामहिम यामीन,

मालदीवची प्रगती, सुरक्षा आणि आर्थिक विकास, ही आपली जेवढी उद्दिष्टे आहेत, तेवढीच भारताचीही लक्ष्ये आहेत. मालदीवचे स्थैर्य आणि सुरक्षा भारताच्या धोरणात्मक हितांशी सरळ-सरळ जोडलेली आहे. मालदीवच्या समस्या, या आपल्यासाठीही चिंतेचा विषय आहेत.

आपल्या शेजारी राष्ट्रांच्या, प्रगतीशिवाय, भारताचा आर्थिक विकास अपूर्ण आहे, असे मी मानतो. “शेजारी प्रथम” हे केवळ आमचे धोरणच नाही, तर ते आपल्या सिद्धांताचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा पण आहे.

मित्रांनो,

मी राष्ट्रपती यामीन यांच्या बरोबर दोन्ही देशांमधील संबंधांशी निगडीत असलेल्या सर्व विषयांबाबत सविस्तर बोलणी केली आहोत. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध हे आपसातील धोरणे, सुरक्षा, आर्थिक आणि विकास यांच्या उद्दिष्टांनी जोडली गेलेले आहोत. आम्ही मालदीवच्या सुरक्षा विषयक गरजां प्रती जागरुक आहोत.

राष्ट्रपती यामीन देखील या मुद्दयांशी सहमत आहेत की मालदीव भारताच्या धोरणात्मक आणि सुरक्षा हितांच्या प्रती पूर्णपणे संवेदनशील राहील.

आमचे हे संयुक्त मत आहे की, भारत आणि मालदीवच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याचा सर्वात उत्तम आणि एकमेव मार्ग हा आपसातील मजबूत मैत्री आहे. संपूर्ण हिंदी महासागरातल्या शांती, समृद्धी आणि सुरक्षेसाठीही हे खूप गरजेचे आहे.

हिंदी महासागरात निव्वळ सुरक्षा प्रदाता म्हणून भारताला आपल्या जिम्मेदारीची पूर्ण जाणीव आहे. जगाच्या या भागातील आपल्या धोरणात्मक हितांचे रक्षण करण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे.

आजच्या आपल्या बोलण्यादरम्यान, अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत सहमती झाली आहे.

संरक्षण क्षेत्रात एक ठोस कृती योजना लवकरात लवकर लागू केल्याने आपले सहकार्य अधिक मजबूत होईल.

बंदरांचा विकास, निरंतर प्रशिक्षण आणि क्षमतेत सुधारणा, आवश्यक उपकरणांचा पुरवठा आणि सागरी टेहळणी, या योजनेतील महत्त्वपूर्ण भाग असतील.

भारत आणि मालदीव मिळून ऊथरु थाईला फालू- UTH- मध्ये बंदरांशी संबंधित सुविधांचा विकास करतील.

आय-हेवन चा विकास ही मालदिवची प्राथमिकता आहे. या प्रकल्पात मालदीव सोबत भागीदारी करण्यासाठी भारत तयार आहे. मालदीव मध्ये पोलीस अकादमीची स्थापना, संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीची बांधणी आणि संरक्षणाशी संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

दक्षिण आशियात सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या विचारांचा पगडा वाढल्यामुळे होणारे नुकसान आणि धोका या प्रती राष्ट्रपती यामीन आणि मी पूर्णपणे सजग आहोत. ते आव्हान लक्षात घेऊन, दोन्ही देशांमधील संस्थांदरम्यान, माहितीची देवाण-घेवाण आणि मालदीवचे पोलीस आणि सुरक्षा दलांचे प्रशिक्षण आणि त्यांच्या क्षमतांचा विकास हा आपल्या सुरक्षा सहकार्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

मदत आणि बचाव कार्यात, नैसर्गिक संकटाच्या काळात आपल्यातील मैत्री आपल्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबतही, दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

मित्रांनो,

आम्ही दोघांनी व्यापार, आर्थिक आणि गुंतवणूकीतील भागीदारीच्या विकासाबाबतही सविस्तर चर्चा केली. भारतात होणाऱ्या “ तिसऱ्या मालदीव गुंतवणूक परिषदेचे” आम्ही स्वागत करतो. या मुळे दोन्ही देशांमधील गुंतवणूक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य सेवांमधील सहकार्य आपली प्राथमिकता आहे. 1995 मध्ये भारताने मालदीव मध्ये जे रुग्णालय उभारले होते, त्याचे आधुनिकीकरण करणे, डॉक्टरांचे दल अधिक मजबूत करणे, आरोग्याशी संबंधित संस्थांची निर्मिती, औषधांची उपलब्धता आणि आरोग्य सेवेशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान याचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.

पर्यटन क्षेत्रात आज झालेले करार दोन्ही देशातील आर्थिक आणि लोकांमधील आपसातले संबंध अधिक मजबूत करेल.

आज आपल्या सहकार्याची झेप पाणी आणि भूमी पार करुन अंतराळाला स्पर्श करत आहे. दक्षिण आशिया उपग्रहाबाबतच्या करारावर आज झालेल्या स्वाक्षऱ्यांचा मालदीव आणि इतर दक्षिण आशियाई देशांना खूप फायदा होईल.

मालदीव सांस्कृतिक वारश्याची भूमी आहे. प्राचीन मशिदी आणि ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण आणि त्यांची देखभाल यासाठी आज झालेले करार आमच्या सांस्कृतिक नात्यांना अधिक मजबूत करेल.

मित्रांनो,

राष्ट्रपती यामीन जी यांनी मालदीव मध्ये होणाऱ्या राजकीय आणि संस्थात्मक सुधारणांबाबतही मला माहिती दिली. मालदीवला, त्याच्या नागरीकांना आणि राजकारणाला सशक्त करणाऱ्या अश्या प्रत्येक प्रयत्नाचे भारत समर्थन करतो.

महामहिम यामीन,

मालदीवच्या सफलतेच्या प्रवासात भारत एक असा मित्र आहे, जो कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक पावलावर मालदीवसोबत कायम राहील. भारत नेहमीच मालदीवचा घनिष्ट मित्र आणि विश्वासनीय भागीदार राहील.

याच शब्दांसोबत मी पुन्हा एकदा आपले भारताच्या भूमीवर स्वागत करतो.

धन्यवाद!

J. Patankar/B.Gokhale