Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी संसद सदस्य प्रभात झा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


नवी दिल्‍ली, 26 जुलै 2024

माजी संसद सदस्य प्रभात झा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी झा यांच्या संघटना कौशल्याचे स्मरण केले तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची देखील आठवण काढली.

एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी संसद सदस्य प्रभात झा यांच्या निधनाने अतीव दुःखी झालो आहे. संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे सक्रीय भूमिका बजावली तसेच त्यांची कार्यशैली मी अत्यंत जवळून बघितली आहे. लोकसेवेच्या त्यांच्या कामांसोबतच त्यांनी पत्रकारिता आणि लेखनाच्या क्षेत्रात देखील अनमोल कार्य केले. या शोकाकुल क्षणी मी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांविषयी सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती!”

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai