Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन.”

आज आपण डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करत आहोत आणि एक शास्त्रज्ञ, विद्वान आणि देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीचे स्मरण करत आहोत. अध्यापन आणि शिक्षणाप्रती त्यांच्या आवडीचा आपण प्रेमाने उल्लेख करत आहोत. डॉ. कलाम यांनी खऱ्या अर्थाने तरुणांच्या मनात विचार करण्याची आणि अभिनवतेचा ध्यास घेण्याची ज्योत पेटवली.

आज डॉ. कलाम आपल्यात नाहीत मात्र भारतासाठी त्यांचे विचार, आदर्श आणि स्वप्ने कायम राहतील.

– नरेंद्र मोदी

S.Kane/ S.Tupe/N.Sapre