Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी आमदार श्री उरीमाजालू के. रामा भट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी आमदार श्री उरीमाजालू के. रामा भट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

“जनसंघ आणि भाजपच्या इतिहासात, उरीमाजालू के. रामा भट जी सारख्या दिग्गजांना विशेष स्थान आहे. त्यांनी कर्नाटकात आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी परिश्रमपूर्वक कार्य केले आणि लोकांची अथक सेवा केली. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो.

“ओम शांती.”