Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिलांनी आपल्या प्रेरणादायी जीवनाचा प्रवास सामायिक करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रोत्साहनपर आवाहन


नवी दिल्ली, 3 मार्च 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमूद केले की, नमो अ‍ॅप ओपन फोरमवर सामायिक करण्यात आलेले असंख्य जीवन प्रवास प्रेरणादायी आहेत. 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक महिलांना या दिवसासाठी आपले  डिजिटल सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्याची संधी मिळेल अशी  पंतप्रधानांनी घोषणा केली आहे. अशा प्रकारचे प्रेरणादायी जीवनप्रवास अधिकाधिक सामायिक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मोदी यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:

“मी नमो अ‍ॅप ओपन फोरमवर खूप प्रेरणादायी जीवन प्रवास सामायिक होताना पाहत आहे, ज्यामधून 8 मार्च रोजी, महिला दिनी, माझ्या डिजिटल सोशल मीडिया अकाउंट्सच्या सोशल मीडिया टेकओव्हरसाठी काही महिलांची निवड केली जाईल. मी असे जीवन प्रवास आणखी सामायिक करण्याचा आग्रह करतो.”

N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com