नवी दिल्ली, 10 एप्रिल 2025
आज महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीर यांना वंदन केले आहे. भगवान महावीर नेहमीच अहिंसा, सत्य आणि करुणेवर भर देत असत आणि त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी सरकारने प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला असून या निर्णयाचे खूप कौतुक झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधान X वरील एका पोस्टमध्ये म्हणाले;
”भगवान महावीरांना आपण सर्वजण वंदन करतो. त्यांनी कायम अहिंसा, सत्य आणि करुणेवर भर दिला. त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात. त्यांची शिकवण जैन समुदायाने सुंदरपणे जपली आहे आणि लोकप्रिय केली आहे. भगवान महावीर यांच्या प्रेरणेने, जैन समुदायाने जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सामाजिक कल्याणात योगदान दिले आहे.
आमचे सरकार नेहमीच भगवान महावीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करेल. गेल्या वर्षी, आम्ही प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला. या निर्णयाचे खूप कौतुक झाले.”
We all bow to Bhagwan Mahavir, who always emphasised on non-violence, truth and compassion. His ideals give strength to countless people all around the world. His teachings have been beautifully preserved and popularised by the Jain community. Inspired by Bhagwan Mahavir, they… pic.twitter.com/BRXIFNm9PW
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2025
* * *
A.Chavan/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai