नवी दिल्ली येथे उद्या होणाऱ्या महालेखाकार आणि उपमहालेखाकारांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. भाषणापूर्वी पंतप्रधान नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या कार्यालयात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करतील.
‘ट्रान्सफॉर्मिंग ऑडिट अँड ॲश्युरन्स इन अ डिजिटल वर्ल्ड’ ही या परिषदेची संकल्पना आहे. अनुभव व ज्ञानाचे आदानप्रदान आणि पुढल्या काही वर्षांसाठी भारतीय लेखापरीक्षण व लेखा विभागासाठी मार्ग आखणे, यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या जलद गतीने बदलणाऱ्या धोरण आणि प्रशासकीय वातावरणात सरकारच्या दृष्टीने आकडेवारीला असलेले महत्व पाहता विभागाचे रुपांतर तंत्रज्ञानप्रणित संस्थेमध्ये करण्यासाठीच्या मार्गांवर गटचर्चा आणि पॅनेल चर्चा या परिषदेत होईल.
वन आयए अँड एडी-वन सिस्टिमची अंमलबजावणी करुन विभाग अंतर्गत लेखापरीक्षण प्रक्रिया स्वयंचलित करत आहे. इंटरॲक्टिव अकाऊंटस आणि डिजिटल लेखा अहवाल सादर करण्यासाठी भेट देण्याच्या प्रक्रिया कमी करण्याच्या दिशेने विभाग काम करत आहे. लेखापरीक्षकांसाठी ज्ञानाधारित संस्था, माहिती तंत्रज्ञान आधारित मंच यादिशेने प्रयत्न सुरु आहेत. बदलत्या युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाभिमुख भारतासाठी गेल्या काही वर्षात भारतीय लेखा आणि लेखा परीक्षण कात टाकून सज्ज होत आहे.
G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane