पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, नागपूर आणि शिर्डी यांना जोडतो.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि नागपूर ते शिर्डी दरम्यानचा हा महामार्ग, या प्रयत्नांचे एक उदाहरण आहे. या अत्याधुनिक रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करून महामार्गावर प्रवासही करुन पाहिला. मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या पुढील आर्थिक प्रगतीसाठी हा प्रकल्प हातभार लावेल.”
We are committed to delivering on top quality infrastructure and the Mahamarg between Nagpur and Shirdi is an example of this effort. Inaugurated this modern road project and also drove on the Mahamarg. I am sure it will contribute to further economic progress of Maharashtra. pic.twitter.com/Conx6yBkmR
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022
देशात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,आणि नागपूर-शिर्डी महामार्ग याच प्रयत्नांचा भाग आहे. या अत्याधुनिक रस्ते प्रकल्पाचे उदघाटन केले आणि महामार्गावरुन प्रवासही केला. हा महामार्ग देशाच्या आर्थिक प्रगतीत मोठे योगदान देईल, अशी मला खात्री आहे. pic.twitter.com/adfPLPj3Ns
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022
आगमन झाल्यावर पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, नागपूर आणि शिर्डी यांना जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या, 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे (महासंपर्क द्रुतगती महामार्ग)प्रकल्प, हे देशभरातील संपर्क व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग, भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो. या द्रुतगती महामार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांमधला संपर्क वाढण्यातही मदत होईल, परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यात मदत होईल.
पंतप्रधान गती शक्ती योजने अंतर्गत, पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणीच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला सामावून घेत, हा समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार अशा पर्यटन स्थळांना जोडेल. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरेल.
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai