Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्रातील बुलढाणा येथील बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त.


पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल  शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी (PMNRF) मधून सानुग्रह अनुदान जाहीर केले असून या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत रुपात देण्यात येणार आहेत. 

 पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

 “महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने खूप दुःख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत ही सदिच्छा. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे.”

 “ बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी मधून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50,000 रुपये मदत स्वरूपात दिले जातील”.

*****

Mahesh I/S. Mukhedkar /CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai