Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली


थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि लेखक महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, महात्मा फुले हे सामाजिक न्यायाचे कैवारी आणि असंख्य लोकांसाठी आकांक्षांचा स्त्रोत म्हणून सर्वत्र आदरणीय आहेत आणि त्यांनी सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि महिला शिक्षणाला गतीशील करण्यासाठी अथक परिश्रम केले.

महान विचारवंत, ज्योतिबा फुले यांच्याबद्दलचे आपले विचार पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे प्रकट केले होते, त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि स्त्री भ्रूणहत्येविरोधात आवाज उठवला तसेच जलदुर्भिक्ष्यावर मात करण्यासाठी मोहिमाही राबवल्या होत्या.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

 “सामाजिक न्यायाचे कैवारी आणि असंख्य लोकांसाठी आशेचा स्रोत, म्हणून महात्मा फुले यांचा सर्वत्र आदर केला जातो. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.”

“आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि काही दिवसांत, 14 तारखेला आपण आंबेडकर जयंती साजरी करतो. मागील महिन्यात #मन की बात  द्वारे त्यांना आदरांजली वाहिली होती. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.”

****

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com