पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्यप्रदेशातल्या सिहोर इथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कल्याण मेळाव्यात, शेतकऱ्यांना संबोधित करणार असून, कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकरी कल्याणासाठीचे सरकारचे उपक्रम ते यावेळी ठळकपणे मांडतील.
पंतप्रधान पीक विमा योजना कार्यान्वित करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वंही पंतप्रधान जारी करतील. पीक विम्याबाबतच्या या अनोख्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात मंजूरी दिली आहे.
येत्या खरीप हंगामापासून ही योजना लागू होईल. खरीप पिकांसाठी एकसमान दोन टक्के तर रब्बी पिकांसाठी 1.5 टक्के प्रिमियम शेतकरी देईल. वार्षिक व्यापारी आणि फलोत्पादन पिकांसाठी प्रिमीयमचा दर पाच टक्के राहील.
या योजनेसाठी सरकारी अनुदानाची अधिकतम सीमा नाही. प्रिमीयम दर कॅपिंगविषयी या आधीच्या योजनेत असलेल्या तरतुदीमुळे शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत होते. मात्र आता शेतकऱ्यांना कोणत्याही कपातीशिवाय विम्याच्या दाव्याची रक्कम मिळेल.
निवडक लाभार्थ्यांना पंतप्रधान पीक विमा निपटारा दावे आणि मृदा आरोग्य कार्ड वितरीत करतील.
N. Chitale / S. Tupe / M. Desai